व्हॉइस ऑफ मीडियाद्वारे पत्रकारांना झालेल्या मारहानीचा घाटंजी येथे निषेध.
दोषींवर कडक कार्यवाई करण्याची निवेदन.
घाटंजी तालुका प्रतिनिधी – अरविंद जाधव
व्हॉइस ऑफ मीडियाद्वारे दोषींवर कडक कार्यवाई करण्याची निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना केली मागणी.
तालुका प्रतिनिधी :-जळगाव जिल्हयातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी दोषींना कडक शासन व्हावे याकरिता मा. तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय घाटंजी आणि मा. ठाणेदार साहेब पो.स्टे. घाटंजी यांना निवेदन देऊन व्हॉइस ऑफ मीडिया तालुका घाटंजीच्या वतीने मागणी करण्यात आली.जळगाव जिल्हयातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण व शिविगाळ केली. आपले कर्तव्य बजावत असतांना पत्रकारांवर केलेल्या हल्याचे कदापी समर्थन करता येणार नाही, पत्रकार महाजन यांच्यावर झालेल्या हल्याचा व्हॉईस ऑफ मीडीयाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदार व त्यांच्या कार्यकत्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी तसेच दोषींना कडक शासन करण्यात यावे.लोकप्रतिनिधी संयम बाळगून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधी शिविगाळ किंवा अपमानजनक वक्तव्य पत्रकारांशी करू नये. अशी समज आमदार किशोर पाटील यांना आपल्या स्तरावरूण देण्यात यावी तसेच पत्रकार संदीप महाजन यांना न्याय मिळवून देण्याबाबत पूर्ण सहकार्य करावे.करिता निवेदन देण्यात आले निवेदन देता वेळेस व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष श्री प्रेमदास चव्हाण, श्री सागर समनवार, अमोल नडपेलवार,महेंद्र देवतळे, अरविंद जाधव सह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.