उमरखेड : भाविक भाऊ भगत यांची वालतूर येथे भेट
भाविक भाऊ भगत यांनी वालतूर येथे भेट दिली या वेळी त्यांनी सर्व नागरिकांसोबत संवाद साधला व हेल्प फाउंडेशनच्या कार्याबद्दल समस्त नागरिकांना माहिती दिली तसेच कुठल्याही प्रकारच्या समस्या असो शासकीय कामे असो गोरगरीब जनतेच्या दवाखान्याची कामे असो या सर्व समस्या निस्वार्थपणे हेल्प फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी सोडवतील अशी त्यांना ग्वाही दिली या वेळी भाविक भाऊ भगत यांनी गावात झालेल्या जल जीवन मिशन अंतर्गत चालू असलेली कामे बघितली तसेच वालतूर येथील पाणीपुरवठा विहिरीची सुद्धा पाहणी केली या विहिरीपर्यंत जाण्यासाठी नागरिकांना फार मोठी कसरत करावी लागते पावसाळ्याच्या दिवसात गावातील सांडपाणी तसेच नाल्यातील सांडपाणी संपूर्ण विहिरीमध्ये जाते त्यामुळे सगळ्या विहिरीचे पाणी हे दूषित झालेला आहे व नागरिकांना मोठ्या प्रमाणात किडनी स्टोन अशा गंभीर स्वरूपाच्या आजारांचा सामना करावा लागत आहे विहिरीला कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाहीये ही सगळी विहीर उघडी आहे त्यामुळे संपूर्ण घाण त्या विहिरीमध्ये जात आहे या विहिरीपर्यंत जायला साधा रस्ता सुद्धा नाहीये त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेताच तात्काळ याची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना या सर्व बाबी ची माहिती देऊन ह्या फार मोठ्या समस्याची माहिती देऊन तात्काळ पाणीपुरवठा विहीर व विहिरीपर्यंत जाण्यासाठी रस्ता तात्काळ मंजूर करण्यात यावा यासाठी भाविक भाऊ भगत प्रयत्न करणार व शंभर टक्के हा काम मार्गी लावणार असे त्यांनी यावेळी सांगितले तात्काळ या संबंधित सर्व पुरावे शासन दरबारी मांडून जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मागणी करून तात्काळ या सर्व योजना मंजूर करून घेण्यात येतील तसेच जलजीवन मिशनचे काम सुद्धा उत्कृष्ट दर्जाचे करण्यात येईल अशी सुद्धा त्यांनी यावेळेस ग्वाही दिली वालतुर वासियांच्या पाठीशी भाविक भाऊ भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेड नेहमी राहील वालतुर गावांमध्ये शासनाच्या सर्व योजना कशा प्रकारे राबविल्या जातील याची सुद्धा त्यांनी यावेळेस योजना केली यावेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत जिल्हाध्यक्ष अनुपभाऊ शेखावत जिल्हा उपाध्यक्ष विष्णू भाऊ चौधरी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद भाऊ राठोड तालुका समन्वयक विनोद भाऊ भोयर गौरवभाऊ राठोड शाखा प्रमुख वालतूर उमेश भाऊ पवार प्रेम भाऊ पवार सर सुभाष पवार रमेश राठोड संजय राठोड प्रदिप जाधव मनोहर जाधव धर्मा पवार गजानन पवार बाबूसिंग राठोड निलेश पवार मधुकर पवार अश्विन जाधव व समस्त नागरिक उपस्थित होते.
उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय जयंतराव काळे.