महागांव – फुलसवंगी / आमदार नामदेवराव ससाने यांनी राहुर,शिरफुली पूरग्रस्त भागाची केली पाहणी…
आज दिनांक 25/07/2023 सोमवार रोजी उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाने यांनी राहुर, शिरफुली या गावांना भेटी देऊन पैनगंगाच्या पुराने गावात नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून महसूल विभागाला तातडीने संबंधितांच्या खात्यामध्ये सानुग्रह अनुदान जमा करण्याचे निर्देश दिले. तसेच नदी नाल्याच्या काठाच्या शेताचे खरडीमुळे झालेल्या नुकसानीचे व शिवारातील शेतीचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सर्वे करण्याच्या सूचना सुद्धा यावेळी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार नामदेवराव ससाने यांच्यासोबत,महागाव तहसीलदार संजीवनी मुपडे,भाजपा तालुका सरचिटणीस योगेश वाजपेयी,गजानन प्रतापवार,राहुरचे सरपंच राजू कदम, अनिल कोरेवाड,शिवाजी गोफनवाड, शिवाजी काचेवार,संजय डांगे,शिरफुली येथील उपसरपंच प्रल्हाद भवरे,दीपक उबाळे,निखिल मोरथकर,,शंकर भोयर,प्रवीण चौधरी, मंडळ अधिकारी संजय नरवाडे ,बालविकास प्रकल्प अधिकारी माने साहेब व तलाठी, ग्रामसेवक,कृषी सहाय्यक व इतर कर्मचारी हो मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.