महागांव / अनागोंदी कारभारामुळे बुडती कडे पावले टाकणाऱ्या जिल्हा बँकेला वाचविण्यासाठी तात्काळ प्रशासक नेमा
(जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी)
महागाव:-
यवतमाळ जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने स्वतःचा स्वार्थ साधुन घेण्यासाठी घेतलेले निर्णय बँकेला डबघाईस आणीत असुन बँकेचे दिवाळे काढणारे असल्याने हे थांबवुन शेतकऱ्यांच्या हक्काची असलेली बँक वाचविणे गरजेचे असुन त्यासाठी बँकेवर तात्काळ प्रशासक नेमण्यात यावे अशी मागणी जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देवुन केली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती संदर्भातील अडी अडचणी सोडविता याव्यात याकरिता जिल्हा बँकेची स्थापना करून त्याद्वारे शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करण्यात येत होते.बँकेचा व शेतकऱ्यांचा हा व्यवहार सुरळीत चालु असतानाच अचानक बँकेने पैसा नसल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास नकार दिला आहे. बँकेत झालेल्या बोगस कर्ज वाटपा मुळे बँक आर्थिक डबघाईस आली आहे. तसेच जिल्हाभरात कॅश वाहन फिरण्यासाठी बँकेकडे भाडे तत्वावर असलेल्या वाहनांची भाडे २६रू. प्रति किलो मिटर दर आहे ही वाहने गेल्या अनेक वर्षापासून आहेत एवढे दर राज्यात कोणत्याही बँक कॅश वाहतूक दार संस्थेचे नाही येवढे आती जादा दर यवतमाळ जिल्हा बँकेकडे असलेल्या वाहनांची आहेत. शेतकऱ्यांना देण्यासाठी कर्ज नाही पण नूतनीकरण रंगरंगोटी फर्निचर च्या नावाखाली वनी व पुसद मध्ये करोडो रुपये खर्च का करण्यात आले याचे उत्तर त्यांनीशेतकरी कर्ज सोडून बँक व्यावसायिक कर्जाकडे वळून संचालकांच्या मर्जीतील असलेल्या साखर कारखाने,पोल्ट्री फार्म,जिनींग यांना अवाढव्य कर्ज वितरीत करून ते थकीत करोडो रूपये ठराव घेऊन माफ करण्यात आले परंतु ज्यांच्या जीवावरही बँक उभी राहिली त्या शेतकरी सभासदांना पिक कर्ज देण्यास बँकेकडे दमडी सुद्धा शिल्लक नाही पैसे खाण्याचे मार्ग जसे,सुरक्षा रक्षक एजंसी,प्रिंटिंग व स्टेशनरी साहित्य खरेदी करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा ह्या आपल्या मर्जीतील लोकाना मॅनेज करण्यात आल्याने भ्रष्टाचारास चालना देणाऱ्या ठरल्या आहेत बँकेमध्ये इतर बँकांनी ठेवलेल्या करोडो रुपयांची ठेवी परत घेतल्याने बँकेवरील विश्वासहर्ता उडल्याची चर्चा ग्राहकांमध्ये असुन बँकेच्या हिवरा व गुंज शाखे अंतर्गत झालेल्या करोडो रुपयाची बोगस कर्ज वाटपाची चालु असलेली चौकशी अजुनही काही संचालकांनी थंडबस्त्यात ठेवली असुन याप्रकरणातील आर्थिक वसुली अद्याप झालेली नसल्याने संचालक मंडळाचे हितसंबंध तर आड येत नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे संचालक मंडळाच्या मर्जीतील ग्राहकांना वाटप करण्यात आलेल्या मोठ्या करोडो रुपयांचे कर्जाची वसुली थकल्यामुळे बँक एनपीएच्या जवळ जवळ गेली आहे . यासर्व प्रकाराची बँकेचे हित चिंतनाऱ्या नागरिकांनी केलेल्या तक्रारीची सुद्धा कोणतीही दखल घेतली गेली नाही त्यामुळेच संचालक मंडळाची मनमानी वाढून बँकेला दिवाळखोरीच्या समुद्रात ढकलण्याची तयारी चालु असुन हे सर्व रोखुन शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक वाचविण्यासाठी बँकेवर तात्काळ प्रशासक नेमण्यात यावे अन्यथा हजारो बँकेच्या सभासदासह स्वातंत्र्य दिनापासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा विदर्भ जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी दिला आहे.
#####चौकट ####
यवतमाळ जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या मनमानीमुळे २७हजार शेतकरी पिक कर्जापासुन वंचित आहेत.त्यामुळे पिक कर्ज न मिळालेल्या सभासद शेतकऱ्यांनी जर आत्महत्या केल्यास त्यास संचालक मंडळ सर्वस्वी जबाबदार राहील.मयत शेतकऱ्यांच्या खात्यातुन बनावट कागदपत्रांद्वारे पैसे काढण्यात आले.तसेच भुमिहीन व्यक्तींना सुद्धा पिक कर्ज वाटप करण्यात आले नूतनीकरणासाठी करोडो रुपयांचे उधळण केली असल्याने या सर्व प्रकारची उच्च स्तरीय चौकशी होवुन सर्व थकीत रक्कम जबाबदार संचालक मंडळाकडून वसुल करण्यात यावे तसेच बँकेचे दिवाळे काढण्यास कारणीभुत असलेले संचालक मंडळ तत्काळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यात यावा.
:- जगदीश नरवाडे(संस्थापक अध्यक्ष विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समिती)