यवतमाळ / सकल मराठा समाज महागांव तालुक्याच्या वतीने दत्ता पाटील हडसनीकर यांच्या उपोषणाला पाठिंबा..
महागाव :- मागील 15 दिवसापासून हादगाव येथे शिवश्री दत्ता पाटील हडसनिकर हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे याकरिता उपोषणाला बसले आहेत. शासन दरबारी त्यांची कोणतीही दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे आज रोजी नांदेड येथे शासकीय रुग्णालयामध्ये ते भरती असुन त्यांची तब्येत अतिशय बिकट आहे. महागाव येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने महागाव चे तहसीलदार यांना निवेदन देऊन दत्ता पाटील हडसणीकर यांच्या उपोशणाची दखल त्वरित घेण्यात यावी याकरिता तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
आता पर्यंत मराठा समाजाने अनेक मोर्चे, आंदोलने केले आहे. तसेच ४५ मराठा तरुण बाधवानी आरक्षणाकरीता आपला जिव गमावला आहे. परंतु या षड शषणाने आत्ता पर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही. भविष्यात दत्ता पाटील हरसणीकर सारखे अनेक मराठा युवक रस्त्यावर येतील. याची गंभीर दखल शासनाने घेऊन मराठा आरक्षण हा विषय मार्गी लाऊन मराठा समाजाला संविधानिक न्याय द्यावा या करिता सकल मराठा समाज महागाव तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख