अखेर महागांव तालुक्यातील डोंगरगाव येथील उर्दू शाळेला मिळाले शिक्षक
शिक्षक मिळत नसल्याने गावकऱ्यांनी शाळेला लॉक मारले होते परंतु गंभीरपणे दखल घेऊन विस्तार अधिकारी गोपाल कस्टमवार यांनी शिक्षक उपलब्ध करून दिले गावकऱ्यांच्या वतीने यांचे आभार मानण्यात आले
महागाव. आज रोजी डोंगरगाव येथे उर्दू शाळेला शिक्षण विभागाचे अधिकारी गोपाल कस्टमवार. विस्ताराधिकारी. व केंद्रप्रमुख खंदारे साहेब या दोघांने शाळेला शिक्षक दिल्याची लेखी ऑर्डर देऊन यांच्या शब्दाचा मान ठेवून डोंगरगाव येथील गावकऱ्यांनी त्यांच्या शब्दाचा मान ठेवून त्यांच्या हाताने शाळेचे लोक उघडण्यात आले व शाळा चालू करण्यात आली तरी विद्यार्थ्याचे भविष्यात होणारे नुकसान पाहताच शिक्षक उपलब्ध करून दिले यावेळेस गावातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सय्यद मुदसीर व.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख अजीम. माजी अध्यक्ष सय्यद जमील. उपाध्यक्ष सय्यद कामिल शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मोहित खान शेख अब्दुल शेका अयुब शेख शफी भाई. नाझीम भाई. गावकऱ्यांनी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख यांचे आभार मानले
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख