यवतमाळ / महागांव येते मनसे तालुका पदाधिकाऱ्यांची निवड पार पडली.
महागाव:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महागाव तालुका नवीन पदाधिकाऱ्यांची निवड स्थानिक विश्राम गृह येथे पार पडलेल्या बैठकीत करण्यात आल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महागाव येथील विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीत ओंकार राऊत यांची तालुका उपाध्यक्ष, सवना विभाग अध्यक्ष पदी श्रीकांत राऊत,फुलसावंगी विभाग अध्यक्ष पदी जीवन मोरथकर,गुंज विभाग अध्यक्ष पदी सुनिल आव्हाड,कलगाव शाखाध्यक्ष पदी योगेश राऊत,पिंपळगाव शाखाध्यक्ष पदी अंगद कदम यांची निवड करण्यात आली यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मनसे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण , शहराध्यक्ष संतोष जाधव,उपाध्यक्ष शेरखान पठाण,विभाग अध्यक्ष विनोद खोंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मनविसे तालुकाध्यक्ष महेश कामारकर, मनविसे तालुका सरचिटणीस राहील शेख, मनविसे तालुका उपाध्यक्ष अमर चव्हाण,प्रेमजीत जाधव,मिथुन राठोड,वैभव कदम,मिथुन राठोड यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख