महागाव तालुक्यातील / डोंगरगाव येथील उर्दू शाळा शिक्षकाविना.विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय
विशेष प्रतिनिधी महागाव यांची रिपोर्ट
महागाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले डोंगरगाव या ठिकाणी उर्दू शाळा गेल्या अनेक दिवसापासून शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक दृष्ट्या नुकसान होत आहे. यासाठी डोंगरगाव येथील शाळा व्यवस्थापन समिती ने नुकतेच महागाव तहसील प्रशासन, तथा गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. दि.०३ जुलै २०२३ रोजी डोंगरगाव येथील गावकरी तथा शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे मा. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना डोंगरगाव येथे उर्दू शाळेकरीता शिक्षक मागणीचे साकडे घातले. या ठिकाणी उर्दू शाळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत उर्दू भाषेचे ज्ञानार्जन करण्यासाठी जवळपास १२९ एवढी विद्यार्थी संख्या आहे. त्याचबरोबर इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत ८३ विद्यार्थी संख्या उपलब्ध आहे. इयत्ता पहिली ते पाचवी करिता एकच शिक्षक उपलब्ध आहे. परंतु आज रोजी तेही शिक्षक आजारी असल्याने अर्जित रजा असल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानरजणाकरिता एकही शिक्षक आज मीतीला या शाळेकरीता नसल्याने गोरगरीब मुस्लिम विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत आहे. महागाव पंचायत समिती विभागात काळी दौलतखान या ठिकाणी १३७ विद्यार्थ्याकरिता एकूण सहा शिक्षक उपलब्ध आहेत. महागाव शहरातील उर्दू शाळेमध्ये ९४ विद्यार्थी संख्या असून या ठिकाणी चार शिक्षक कार्यरत आहेत. परंतु डोंगरगाव या ठिकाणी आज एकही शिक्षक उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होऊ नये, यासाठी येथील शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकरी पालक यांनी येत्या सात जुलै पर्यंत शिक्षक मागणी पूर्ण न झाल्यास डोंगरगाव येथील उर्दू शाळेला कुलूप लावून विद्यार्थ्यांसह गट शिक्षण अधिकारी कार्यालयात बसविण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.