ताज्या घडामोडी

महागांव / कृषी दिन व वसंतराव नाईक जयंतीनिमित्त TDRF द्वारा “एक जवान, एक वृक्ष” या उपक्रमाद्वारे तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण.

महागांव / कृषी दिन व वसंतराव नाईक जयंतीनिमित्त TDRF द्वारा “एक जवान, एक वृक्ष” या उपक्रमाद्वारे तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण

 

कृषी आणि निसर्ग, शेतकरी आणि वृक्ष दोघांचेही संगोपन म्हणजे राष्ट्रोन्नती

 

महागांव :- दरवर्षीप्रमाणे दि. १ जुलै रोजी कृषी दिन व हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त TDRF द्वारा “एक जवान,एक वृक्ष” हा उपक्रम राबवून विदर्भातील वेगवेगळ्या कंपनीतील(तालुक्यांमधील) सर्व TDRF अधिकारी व जवान यांनी आपल्या घराच्या अंगणात तसेच आजूबाजूच्या परिसरात सोबतच मोकळ्या जागेत व ज्या ठिकाणी झाड नाही अशा विविध उपयोगी वृक्ष लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन त्यांची निगा राखण्याचे संकल्प घेतले.

या उपक्रमाच्या माध्यमातून महागांव तालुक्यातील TDRF जवानांनी TDRF संस्थापक तथा संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात महागांव तहसिल कार्यलयाच्या परिसरात व ग्रामीण भागात विविध ठिकाणी वड, पिंपळ, कडूनिंब, उंबर, सीताफळ, इ. उपयोगी वृक्षांची लागवड केली. या उपक्रमाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून TDRF जनसंपर्क अभिषेक राजहंस कार्यरत होते. सोबतच महागांव कंपनी असिस्टंट कंपनी कमांडर रोहित कदम, कंपनी ड्रील इंस्ट्रक्टर स्वराज पवार, भारत राठोड , क्रिष्णा चव्हाण, रोहित तळनकर, प्रमोद राठोड, जय जाधव, इश्वर जाधव, कुमार राठोड, अभिमन्यु राठोड, समर्थ राठोड, दुर्गेश घोडे,शिवम चव्हाण, परमेश्वर काचगुंडे, नंदराज राठोड, रामेश्वर चव्हाण, ओमकार चव्हाण, श्रुती बोविंदवाड, श्रावनी बोंडारे, राधिका जाधव इ. जवानांनी विशेष कार्य केले.

 

महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *