महागांव /माळकिन्ही येथे शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग पेरणीच्या तोंडावर खत,बियाणे, साहित्य जळून खाक
महागाव / तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी देविदास सूर्यभान शेंबडे वय ६० वर्षे यांच्या शेत.सर्वे १४४ शेतातील गोठ्याला सोमवारच्या रात्री अचानक आग लागल्याने गोठ्यातील साहित्य जळून खाक झाले ही घटना मंगळवारी सकाळी शेतकरी देविदास शेंबडे शेतात गेल्यावर निदर्शनात आली शेतकरी देविदास शेंबडे यांना चार एकर कोरडवाहू जमीन आहे घरची जेमतेम परिस्थिती असल्यामुळे पैशाची जुळवाजुळव करून खरीप हंगामासाठी लागणारे खते बी बियाणे शेतातील गोठ्यामध्ये दोन दिवसांपूर्वीच नेऊन ठेवले होते गोठ्यात २६ पोते खत कपाशीचे बियाणे व मशागतीचे पेरणी साहीत्य व जनावरांची वैरण होती हे सर्व साहित्य जळून खाक झाल्याने अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे घटनास्थळी तलाठी ज्ञानेश्वर चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष बाळू कुबडे व इतर शेतकऱ्यांच्या समक्ष झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला सदर शेतकऱ्यावर ऐन पेरणीच्या तोंडावर आर्थिक संकट ओढावले आहे प्रशासनाने सदर घटनेला गांभीर्याने घेऊन शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून होत आहे
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख