ताज्या घडामोडी

विविध कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी कधी मिळणार ? (जनआंदोलन आधार संघर्ष समिती यांचा प्रशासनाला सवाल)

विविध कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी कधी मिळणार ?

(जनआंदोलन आधार संघर्ष समिती यांचा प्रशासनाला सवाल)

महागाव:-कायमस्वरूपी अधिकारी मिळण्याची मागणी केल्या नंतर गटविकास अधिकारी त्या पाठोपाठ तहसीलदार ठाणेदार तालुक्याला मिळाले परंतु इतर कार्यालयाला कायमस्वरूपी अधिकारी कधी मिळणार असा सवाल जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी उपस्थित करून यासाठी लवकरच जनआंदोलन छेडणार असल्याची माहिती दिली.

महागाव तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासुन विविध कार्यालये प्रभारावर असुन यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, जि. प.बांधकाम,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी,भुमिअभिलेख,वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय काळी(दौ) तसेच महागाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांचा समावेश आहे .या प्रभारी राज मुळे जनतेची कामे खोळंबुन तालुका विकासाच्या बाबतीत माघारला गेला.या प्रभारी अधिकऱ्यांच्या मनमानीमुळे त्यांच्या अधिनस्थ असलेले कर्मचारी जनतेची पिळवणूक करीत असल्याने व याकडे लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नसल्याने जनआंदोलन आधार संघर्ष समितीने समोर येवुन महागाव मधील सर्वच प्रभारी अधिकाऱ्यांच्या जागेवर कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याच्या मागणीला घेवुन जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे आंदोलनाचा ईशारा दिला होता त्यांच्या या निवेदनानंतर महागाव येथे कायमस्वरूपी गटविकास अधिकारी व आता तहसीलदार ठाणेदार मिळाला परंतु प्रभारावर असलेल्या ईतर कार्यालयांना कायमस्वरूपी अधिकारी कधी मिळणार?जर या प्रभारी अधिकाऱ्यांच्या जागी कायमस्वरूपी अधिकारी न नेमल्यास जनआंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने लवकरच तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी दिली आहे.

तहसील कार्यालय मध्ये पैशाशिवाय काम होत नसल्याचे चित्र या अगोदर बघायला मिळत होते त्याची पुनरावृत्ती होऊ नये सातबाराचे शेतकऱ्यांन कडून 50 ते 100 रुपये न घेता पंधरा रुपयात मिळाला पाहिजे हा धाडसी निर्णय नवनियुक्त तहसीलदार यांनी घ्यावा ठाणेदार यांनी तालुक्यातील गो माता तस्करी जुगार मटका गावोगावी दारूचा महापौर गुटखा बसथानक परिसरातील अवैध वाहतूक यावर प्रतिबंध लावावा अशी अपेक्षा तहसीलदार व ठाणेदार यांच्या कडून आहे

:- जगदीश नरवाडे(संस्थापक अध्यक्ष जनआंदोलन आधार संघर्ष समिती)

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *