महागाव /पोखरी येथील वैष्णवी रोहिदास राठोड. NEET परीक्षा २०२३ मध्ये ७२० पैकी ७०० गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले.
महागाव तालुक्यातील पोखरी (इजारा/) येथील वैष्णवी रोहिदास राठोड या विद्यार्थिनीने अखिल भारतीय प्री मेडिकल प्रवेश परीक्षेत(NEET Exam) ७२० पैकी ७०० गुण मिळवून एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. ऑल इंडिया रँक मध्ये तिला २३० वा क्रमांक आहे. तर ऑल इंडिया ओबीसी ग्रुप मध्ये ती ४४ क्रमांक आहे. तिच्या या गगनचुंबी यशाने महागाव तालुक्याच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला आहे. पोखरी या बंजारा बहुल गावाची रहिवासी असलेली ही सावित्रीची लेक एका क्षणात देशभरात आयकॉन ठरली असली तरी यशाच्या वाटेवरील तिचा काटेरी प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे. वैष्णवी चे वडील देविदास राठोड यांचा २०११ मध्ये मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला. या धक्क्याने कुटुंब उध्वस्त झाले. वैष्णवी सुनीता ही गृहिणी आहे. मोठी बहीण आणि वैष्णवी या दोघीही शिक्षणात अत्यंत तल्लख.
वडिलांचा आधार गेल्यामुळे अनाथ झालेल्या मुलींना मामा शंकर बळीराम जाधव यांनी सहारा दिला. ते चंद्रपूर येथे महाजेनको मध्ये कार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. दोन्ही भाच्यांची त्यांनी जबाबदारी उचलली. थोरली बहीण अश्विनी सुद्धा नीट परीक्षेत चमकली होती.
एमबीबीएस प्रवेश थोड्या गुणांनी हल्ल्यामुळे ती एमबीबीएस करत आहे. वैष्णवी ने मात्र कठोर परिश्रम करून मोठया गुणांनी यश प्राप्त केले. चंद्रपूर येथील जय हिंद कनिष्ठ महाविद्यालय ती शिकत होती. कुठल्याही शिकवणी वर्गशिवाय केवळ शाळेत तयारी सुरू करून तिने हे अभूतपूर्व यश मिळवले. पितृछत्र गमावल्यानंतरही वैष्णवीने चिकटे आणि मेहनतीच्या बळावर यश मिळवले. तिच्या या यशामुळे आमच्या पापणीत अश्रू आणि उरात अभिमान असल्याची प्रतिक्रिया मामा शंकर जाधव यांनी दिली.
अभ्यासातील सातत्य, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई, मोठी बहीण, मामाच्या प्रोसनामुळे यशाला गवसणी घातला आली असे मनोगत व्यक्त केले. एमबीबीएस अभ्यासक्रमानंतर एमडी हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून कार्डियालॉजिस्ट किंवा युरोलॉजिस्ट होणार असे व्यक्त केले.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख