महागाव दहीसावळी/इंजिन मधील बिघडामुळे चालत्या एस टी बसने घेतला पेट
दहीसावळी नजीकची घटना,सुदैवाने जिवीतहानी टळली.
महागाव:-इंजिन मध्ये घडलेली तांत्रिक बिघडामुळे चालत्या बसने अचानक पेट घेतला परंतु चालक,वाहक व प्रवाशांच्या समय सुचकतेने जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
माहूर आगार ची नागपुर माहूर बस क्र एम एच२० बी एल४००८ आज(दि६जुन)मंगळवार रोजी नेहमीप्रमाणे प्रवाशी घेवुन महामार्गावरून माहूर कडे मार्गक्रमण करीत असतांना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास महागाव तालुक्यातील दहिसावळी गावानजीक इंजिन मध्ये तांत्रिक बिघाड होवुन शॉर्ट सर्किट होवुन वायरने पेट घेतला व एकदम आगीचे लोळ उठायला सुरुवात झाली यावेळी चालक सुनिल राठोड व वाहक ताराचंद राठोड यांनी प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला घेवुन प्रवाशांना सुखरूप बसमधून खाली उतरविले व बस मध्ये असलेल्या अग्निशमन साधनांच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न केले सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बस जळाल्याची माहिती मिळताच तालुक्यातील गावाच्या दौऱ्यावर असलेले नवनियुक्त उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे,तहसीलदार विश्वांभर राणे, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस,मंडळ अधिकारी एम.एकुलवार यांनी भेट देवुन प्रवाशांची विचारपूस केली.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख