महागांव तालुक्यातील तिवरंग येथे ग्रामपंचायतला दिली जमीन दान
महागाव तालुक्यातील तिवरंग येथे जलजीवन अंतर्गत काम सुरू करण्यासाठी स्वताच्या मालकी हक्काची (दोन गुंठे) जमीन आनंद भिका राठोड यांनी ग्रामपंचायतला दान दिली. त्या जागेमध्ये ग्रामपंचायतने विहीर खोदली.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे औचित्य साधून आनंद भिका राठोड यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी तिवरंग येथील सरपंच जयश्री राठोड, पोलीस पाटील युवराज मदने पाटील, ग्रामपंचायत सदस्य सोबिन चव्हाण, सुनिता नानोर आशा सेविका सीमा जाधव ,कौशल्य वाघमारे व गावातील नागरिक उपस्थित होते.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख