क्राईम डायरी

पोफाळी येथे चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री चार ठिकाणी धाडसी चोरी

पोफाळी येथे चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री चार ठिकाणी धाडसी चोरी

दागिन्यांसह रोख सहा लाख चाळीस हजार रुपये लंपास

 

बुधवारच्या मध्यरात्री यवताळमाळ जिल्हयाच्या उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे चार ठिकाणी धाडसी घरफोडी झाल्याची खळबळ उडवून घटना सकाळी उघडकीस आली एकाच रात्री चार ठिकाणी झालेल्या घरफोडीत दागिन्यांसह रोख रक्कम अशी एकूण सहा लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला तर घटनास्थळी डॉग स्कॉड बोलवण्यात आले सोबतच ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले होते. या धाडसी चोरीमुळे मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

चार ठिकाणी चोरी झाली यात पोफाळीचे पोलीस पाटील माधवराव गुंढारे, गणेशराव ढोणे, बबन शेळके व आजीस पठाण या चार जणांच्या घरी चोरटे घुसले होते यात सगळयात जास्त चोरट्यांनी पोलीस पाटील यांच्या घरातून ऐवज लंपास केला तर गणेश ढोणे यांच्या घरातून एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले, बबन शेळके यांच्या बंद घरातून चोरट्यांनी तीन हजार रुपये चोरीला गेले. मात्र, आजिस पठाण यांच्या घरातून चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.

 

एकाच रात्री झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी पोफाळीचे पोलीस पाटील माधवराव गुंढारे यांच्या घराच्या भिंतीवरून घरामध्ये प्रवेश केला आणि घरातील खोलीत प्रवेश करूण कपाट खोलून कपाटातील साहित्याची फेकफाक केली तर डब्यातून सोन्याचे दागीने गंठण पाच तोळे तीन लाख दहा हजार, लांब पोत दिड तोळा किंमत त्र्यानव हजार रुपये, आंगठी सात ग्रॅम बेचाळीस हजार, चांदी पाच तोळे अंदाजे किंमत तीन हजार सहाशे व सुटकेस मध्ये नगदी पन्नास हजार रूपये असा एकून चार लाख अठयान्नव हजार रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी हात साफ केला.

 

गणेशराव ढोणे यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला व घरातील कपाट खोलून त्यातील दिड तोळ्याचा सोन्याचा हार अंदाजे किमत 93 हजार व दोन अंगठ्या साडेआठ ग्रैम पजणी ४९ हजार असा एकून 1 लाख 42 हजार इतका मुद्दे माल चोरट्यांनी लंपास केला

 

माधव गुंढारे यांच्या घराच्या पाठीमागे असलेले बबन शेळके यांचे घरी कुणीही नव्हते ते लग्न समारंभासाठी नातेवाईकांकडे बाहेरगावी असल्याने त्यांच्या घराला लॉक होते ते लॉक तोडून चोरटयांनी घरामधील सर्व सामान अस्थावेस्थ केले पण त्यांच्या घरामधील लोखडी पेटीत असलेले तीन हजार रुपये चोरट्यांनी नेले .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *