एकता पत्रकार संस्थेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार
घाटंजी(प्रतिनिधी) घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणूक मध्ये एकता पत्रकार संस्थेचे अध्यक्ष कैलास कोरवते हे ग्रामपंचायत मतदार संघात अनुसूचित जाती/जमाती मधून 206 मते घेऊन विजयी झाले तर एकता पत्रकार संस्थेचे सदस्य नंदकिशोर डंभारे जे सहकार संस्था मतदार संघात सर्वसाधारण गटातून 164 मते घेऊन विजयी झाल्या बद्दल एकता पत्रकार संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित दोन्ही संचालक यांच्या पत्रकार भवन कार्यालयात शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव बाजार समिती आहे कि इथे पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून एकता पत्रकार बहुद्देशीय संस्थेचे दोन संचालक निवडून आले आहे त्याचा आनंद साजरा करत संस्थेचे सर्व सदस्यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला यावेळी एकता पत्रकार संस्थेचे उपाध्यक्ष कज्जुम कुरेशी सल्लागार गणेश भोयर अरविंद चौधरी बंडू तोडसाम,सचिन करनेवार,अरविंद जाधव,अरुण कांबळे व वसीम खान इत्यादी पत्रकार उपस्थित होते