खडका येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा सत्कार व निरोप समारंभ
यवतमाळ/ महागाव पंचायत समितीतील उपक्रमशील व आदर्श शाळा म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा खडका. 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समितीने शाळेमध्ये दहा ते बारा वर्ष सेवा कार्य करणारे शिक्षकांची बदली झाल्यामुळे त्यांच्या निरोप समारंभाचे व सत्काराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री विजयराव देशमुख होते . प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र पुरोहित, श्री दत्तराव कदम, श्री किसनराव देशमुख, श्री पाटील साहेब कृषी सहाय्यक ,डॉ. मानसी कदम, अंबेकर ताई, नितीन ठोके पो पा, राजेंद्र ठाकरे, विशाल रोहनकर, संजय वाघमारे , यतीन पुरोहित, जगदीश भामकर, चंद्रकांत देशमुख उपस्थित होते. सर्व मान्यवर मंडळींच्या शुभहस्ते जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप गावंडे, शिक्षक अनुप पंडित कु.शितल वाघमारे, कुणाल भगत, निलेश रावेकर तसेच पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 पशुधन अधिकारी डॉ. बी के गरुड या सर्व कर्मचाऱ्यांची खडका येथून बदली झाल्यामुळे त्यांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ पेन व जिजाऊ चरित्र आणि संत विचार हे पुस्तके देऊन करण्यात आला. तसेच अमरावती विभाग भूमि अभिलेख मध्ये निवड झालेले आदेश राजेंद्र ठाकरे व स्कॉलरशिप परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक कु प्राची संदीप शिंदे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. सर्व कर्मचारी व वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभा निमित्त सर्वांना रस पोळीचे जेवण देण्यात आले. प्रदीप गावंडे अनुप पंडित शितल वाघमारे या शिक्षकांनी व सातवीची विद्यार्थिनी श्रृती हणवते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संदीप शिंदे यांनी केले तर प्रास्ताविक श्री दत्तराव कदम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष देशमुख, उपाध्यक्ष गजानन भामकर, सदस्य डॉ. संदीप शिंदे, संजय देशमुख, शरद देशमुख, संतोष भालेराव, प्रदीप शिंदे, सुभाष हेडे, माधव मारटकर, गजानन सुरोशे, विलास देशमुख, राहुल भामकर, दशरथ मारटकर यांनी प्रयत्न केले.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख