महागाव तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान… महागाव तहसीलदारां मार्फत तात्काळ नुसकानग्रस्तांची पाहणी.
यवतमाळ/ महागाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी वादळाचा तडाका आणि गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांची विकासही गुराढोरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रसंगी महागावचे तहसीलदार आपल्या टीम सह तत्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. तालुक्यातील डोंगरगाव ,बोथा ,वाकोडी ,काळी दौलत खान ,करंजखेड फुलसांगी इत्यादी ठिकाणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांना शासनाकरवी आर्थिक मदत मिळावी या उदात हेतूने महागाव चे तहसीलदार विश्वंभर राणे साहेब यांचे सहमंडळ अधिकारी कृषी सहाय्यक पांडुरंग बहिण वाढ तसेच तलाठी कल्पनापुसनाके यांचेसह कोतवाल देवानंद आदी महसूल कर्मचारी टीम यावेळी उत्कृष्ट कार्य करण्यासाठी झटले. डोंगरगाव येथील शेतकरी शरद दत्तराव देशमुख यांच्या शेतातील आंबा आणि केळी पिकाचे नुकसान पाहणी करण्यात आली .परिसरातील बोथा येथील अल्पभूधारक शेतकरी प्रल्हाद बाळू कवडे यांचे शेतात एक बैल आणि एक वासरू गारपिटीने मृत्यू पावल्याने आर्थिक नुकसान मिळणे करिता महागात तहसीलदार यांना नुकसान भरपाई साठी विनंती करण्यात आली. महागाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या आंब्याच्या झाडाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेकांच्या घरावरील टिनपतरे उडाल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू धान्य, संसार उपयोगी वस्तूंची वाट लागली .करंजखेड येथेही वादळी वाऱ्यामुळे यामध्येतीन पत्रे पतंगाप्रमाणे हवेत उडाल्याने काही गुरांची जीवित हानी झाली .आधिचयवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेती मलाला मातीमोल भाव मिळत असल्यामुळे परेशान असताना आणि यातच नैसर्गिक संकट ओढवली असल्यामुळे हताश झाला आहे.निसर्गाच्या प्रकोपामुळे अनेक शेतकऱ्यां वरती आर्थिक संकट आले आहे. शेतकरी राजांना थोडाफार दिलासा म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याकरिता महागावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार विश्वंभर राणे यांनी तत्काळ नुसकानग्रस्तांची पाहणी करून शासनाकडे मदतीसाठी पाठपुरावा केल्याने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल. अशा प्रकारच्या लाभार्थ्यांच्या अशा पल्लवीत झाले आहेत.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख