महागांव / वाघनाथ येथे आयोजित श्रीराम व श्री हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह संपन्न
महागाव/वाघनाथ येथे आयोजित श्रीराम व श्री हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भागवत कथा ज्ञान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. या सप्ताहातील पाचवे पुष्प गुंफताना ह भ प कांचन ताई शेळके अमरापूरकर यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चार चरणांचा अभंग, हेचि थोर भक्ती आवडत देवा ,संकल्पावी माया संसाराची , ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्त असु द्यावे समाधान,वाहीला उद्वेग दुःखाची केवळ,याचा अर्थ कीर्तनात भक्तांना सांगत असताना.संसारातील माय देवाला अर्पण करावी हीच थोर भक्ती आहे आणि ती देवाला आवडते. अनंताने संसारामध्ये जसे ठेवले तसे राहावे आणि चित्तामध्ये समाधान असू द्यावे.तसेच पुढे सांगताना राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य संकल्पिका जिजाऊ मा साहेबांनी बाल शिवबांना उत्तम शिक्षण संस्कार दिले म्हणून शिवराय छत्रपती व आदर्श राजे झाले तशीच शिकवणसर्व महिलांनी आपल्या मुलाबाळांना द्यावी. अशा त्या सांगत होत्या.या सप्ताहात भागवत कथा ह भ प करूण जी महाराज कांबळे आळंदीकर यांच्या ससाळ वाणीतुन पार पडला.तसेच ज्ञानेश्वर पारायण व्यासपीठ ह भ प रामराव महाराज शिंदे वाघनाथकर यांनी पार पाडले . सुप्रसिद्धमृदंगाचार्य यांचे उपस्थित सर्व श्रुती मंडळींनी टाळ्या वाजवून स्वागत केले आहे या सप्ताह साठी कीर्तनासाठी भागवत कथा ऐकण्यासाठी परिसरातील अनेक भजनी मंडळी वारकरी मंडळी श्रोते मंडळी यांची उपस्थिती मोठया संख्येने पहावयास मिळली आहे.
तालुका विशेष प्रतिनिधी लतिफ: शेख