महागांव / अज्ञात व्यक्तींनी भुईमूग पिकावर फवारले तणनाशक, लाखो रुपयांचे झाले नुकसान
(नुकसान भरपाई द्यावी शेतकर्यांची मागणी)
कलगाव येथेल शेतकऱ्यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने फवारले तननाशक लाखो रुपयांचे झाले आहे नुकसान कलगाव येथील शेतकरी श्री सुशिल नारायणराव राऊत यांच्या शेतात भुईमूगाचे पिक आहे सदर पिकावर अज्ञात व्यक्तीने तननाशक फवारले आहे ही बाब लक्षात येताच सुशिल नारायणराव राऊत यानी पोलीस स्टेशन महागाव येथे जाऊन फिर्याद दिली आहे झालेल्या घटणेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशन महागाव चे उप पो निरीक्षक पवार साहेब व सतोष जाधव यानी शेतात येवून पाहानी केली व कलगाव कृषी सहाय्यक मोरे साहेब यानी सुध्दा सदर शेतात येवून झालेल्या नुकसानीची पाहानी केली, हाता तोंडाशी आलेले पिक डोळ्यासमोर जळत आहे शेतात तननाशक फवारणी करणाऱ्यां अज्ञात व्यक्तिचा लवकरत लवकर शोध घेऊन मला न्याय दयावा शेतकरी सुशिल राऊत यांची शासनाकडे मागणी
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख