महागांव / येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती साजरी.
या जयंतीनिमित्त महामानवाचे विचार कार्य व भारतीय राज्यघटना या विषयावर बहुपर्यायी सामान्यज्ञान स्पर्धेचे परीक्षेचे आयोजन करण्यातआल
सादर परीक्षा दिनांक 12/4/23 रोजी बुधवार बौध्द विहार महागाव येथे सायंकाळी ठीक 4 ते 5 ह्या दरम्यान एक तासभर घेण्यात आली. नंतर सदर परीक्षेचा निकाल व सहभागी विद्यार्थांचा सत्कार आज दुपारी 2 वा बौध्द विहार महागांव येथे आला.. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उमरखेड विधानसभेचे आमदार ससाने साहेब आणि ईतर मान्यवर उपस्थित होते..
परीक्षेचे आयोजक शुभम हनवते (M-tech, GTE) यांची संकल्पना असून व्यवस्थापक तृप्ती खंदारे व छाया ताई खंदारे ह्या उपस्थित होत्या म्हणून परीक्षा अगदी सुरळीत आणि शांततेत पार पडली ,अगदी कमी वेळेमध्ये 60-70 च्या जवळपास विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद परीक्षेला लाभला, चिमुकल्या पासून ते मोठ्या पर्यन्त सर्वच जण ह्या परीक्षेला बसले, ह्या परीक्षे माध्यमातून जे स्पर्धा परीक्षेचि तयारी करत आहेत त्यांना भविष्यात उपयुक्त पडेल किन्वा जे शालेय विद्यार्थ्यांना अश्या परीक्षेचि माहिती व्हावी ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवावे ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चे निमित्ताने ह्या वर्षी जयंती नाचून नाहीतर वाचून साजरी करूया हाच उद्देश ठेऊन महागाव मधे प्रथमच सामान्यज्ञान स्पर्धेचे उपक्रम पार पडला.हा प्रथमच उपक्रम असून अतिशय कमी वेळे मध्ये विद्यार्थ्यांनीचा उदंड प्रतिसाद मिळाला, परीक्षेत चांगले गुण मिळवून पास झालेल्या सर्वोत्कृष्ट 13 विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटना व ईतर पुस्तके आणि सन्मानपत्र आमदार साहेबांच्या हस्ते देण्यात आल.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख