महागांव / पुस धरणाचे चे पाणी पुस नदी पात्रता सोडा.. सरपंच सौ. स्नेहा ठाकरे
पुस धरणाचे चे पाणी पुस नदी पात्रता सोडा.. सरपंच सौ. स्नेहा ठाकरे यांनी दिनांक १३ एप्रिल रोजी महागाव चे तहसीलदार यांना निवेदन देऊन पुस नदी पात्रता धरणाचे पाणी सोडावे अशी मागणी करंजखेड च्या सरपंच सौ स्नेहा संदीप ठाकरे आणि गावातील नागरिकांनी केली आहे. महागाव आणि तालुक्यातील अनेक गावे पुस नदी काठावर वसलेले असून महागाव, मोरथ,उटी,कलगाव,जनुना, करंजखेड ,हीवरा,सदर गावातील पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा वापर याच नदी पात्रतातुन होत असून गेली अनेक दिवसांपासून हे नदी पात्र पूर्णतः कोरडे पडले आहे, पाणी नसल्यामुळे मुक्ये जनावर पिण्याच्या पाण्यासाठी गावभर व माळरानात भटकंती करताना दिसुन येत आहेत. करीता संबधीत प्रशासनाने तात्काळ लोअर पुस प्रकालपाचे पाणी पुस नदी पात्रता सोडून ह्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा अशी मागणी निवेदनादरे माननीय जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार महागाव यांना करंजखेड येथील माझी पंचायत समिती सदस्य संदीप सुभाषराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रवीण सिताराम ठाकरे, अविनाश भांगे, भरोसा भुरा चव्हाण आणि करंजखेड येथील सरपंच सौ स्नेहा संदीप ठाकरे तसेच गावकरी मंडळी ने केली आहे. पुस नदीतीरावर वसलेल्या अनेक ग्रामपंचायत मार्फत ठराव घेऊन नदीपात्रात पाणी सोडण्याचे निवेदन पंचायत समिती महागाव यांना दिले असून लवकरात लवकर नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात यावे अन्यथा येणाऱ्या पुढील काळामध्ये आंदोलन करण्याचा इशारा या गावातील नागरिकांनी दिला आहे.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख