थार (बु)येथील संकट ग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत (किशोर भवरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
महागाव:-विज पडुन बैलजोडी दगावलेल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत देवुन सामाजिक कार्यकर्ते किशोर भवरे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली.
अस्मानी व सुलतानी संकटाच्या माऱ्याने शेतकरी पुरता पिचला असुन संकटाची मालिका काही शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही अशातच दिनांक ७ एप्रिल रोजी वादळीवारा ,प्रचंड मेघगर्जना, विजांच्या कडकडाट गारपिटीसह कोसळलेल्या अवकाळी पावसाने सुद्धा शेतकऱ्याला झोडपुन काढले.याचवेळी तालुक्यातील थार(बु) येथील युवा शेतकरी रेणुकादास शिंदे यांच्या शेतातील झाडाखाली असलेल्या बैलजोडीवर विज कोसळुन दोन्ही बैल मृत्युमुखी पडले त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते, नांदेड मनपाचे माजी महापौर किशोर भवरे यांनी सामाजिक दायित्व जोपासुन थार येथे पोहचुन पिडीत शेतकऱ्याला तातडीची आर्थिक मदत करून सांत्वन केले.यावेळी ऍड.लक्ष्मीकांत भांगे,विष्णु पाटील पाऊलबुद्धे,सरपंचपती विनोद पाटील इंगळे,आशिष गावंडे पत्रकार भगवान फाळके,महेश कामारकर यांच्यासह शिंदे परिवारातील सदस्य व गावकरी उपस्थित होते.यावेळी पीडित शेतकऱ्याला शासनाची मदत मिळवुन देण्यासाठी सदैव तत्पर असल्याची प्रतिक्रिया किशोर भवरे यांनी दिली.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख