उमरखेड / ढाणकी येथे रोजदारांसाठी इफतार पार्टीचे आयोजन.
ढाणकी प्रतिनिधी /अजीज खान रमजानच्या रोजाची सांगता इफ्तारने होते. सूर्योदयापूर्वी तांबडं फाटण्यापूर्वीपासून तर सूर्यास्तानंतरची लालसर कांती फिटेपर्यंत दिवसभर रोजा ठेऊन सुर्यास्तानंतर थोडंसं काही खाऊन पाणी प्याले जाते आणि त्यानंतर खाण्यापिण्यास परवानगी असते, या सोपस्काराला ‘इफ्तार’ म्हणतात. इफ्तारच्या वेळी तहानेने ओठ सुकून त्यावर चढलेली पपडी पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ग्रामीण भागातल्या लोकांची जाणीव करून देते, तर पोटात भुकेने उठलेला आगडोंब हा दिवस दिवसभर जीवनाचा घासदेखील मोठ्या कष्टाने ज्यांच्या नशिबी असतो, त्यांच्याप्रति एक सामाजिक बांधिलकी निर्माण करतो. अशाप्रकारे हा रोजा आणि हा इफ्तार गरिबांना मदत करण्याची प्रेरणा देतो. या गोर गरीब लोकाना मदत महणून इफातर पार्टी करण्यात आली. यावेळी शेख. सुहेल, अजिम खान, साहील कुरेशी, वल्ही कुरेशी, अयुफ, शारूख, तोहित, आदिल, खाजा, फारूक,मो. शारुखं, आमू भाई अल्ताफ, अनिस, सलमान, जबर इतियादी योकानी संयोग नोदविला.