महागाव येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
महागाव येथे दरवर्षप्रमाणेच याही वर्षी रामभक्त चिरंजीव भगवान हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमान मंदिर तहसील कार्यालय चे आवारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी गिरीश महाराज यांचे हस्ते एम डी सुरोशे यांनी अभिषेक व पूजा अर्चा करण्यात आली सकाळ पासून पुजा करण्यासाठी भाविक भक्तांची रांग लागली होती.व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सर्व हनुमान भक्तांनी प्रचलित शब्द जयंती न म्हणता हनुमान जन्मोत्सव असे संबोधित करावे.
जयंती जो व्यक्ती भुतलावर नाही अशा लोकांची होते.
कलियुगात श्रीराम भक्त हनुमान हेच एकमेव चिरंजीव आहेत त्यामुळे आपण सर्वांनी जन्मोत्सव असे म्हणावे यानंतर जयंती हा शब्द म्हणणे बंद करावा असे आवाहन एम डी सुरोशे यांनी केले. यावेळी मनोज उर्फ एम डी सुरोशे, दत्तराव कदम, कमलेश देशमुख, रमेश मस्के, वानखेडे सर, अजय उंबरकर, चेतन केळकर, बबन मोहटे, रवी भेने आदी उपस्थित होते.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख