कृषी कीर्तनकार ह .भ .प .गंगाधर महाराज कुरुंदकर यांची अमृत पॅटर्न चे जनक यांच्याशी भेट व चर्चा
महागाव तालुक्यातील कापसाचे विक्रमी उत्पादक, प्रगतशील शेतकरी अमृत पॅटर्नचे जनक शिवश्री अमृतराव दादाराव देशमुख यांची भेट कृषी कीर्तनकार, शिव कीर्तनकार ह .भ .प .गंगाधर महाराज कुरुंदकर (प्रदेशाध्यक्ष संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य) यांनी भेट घेतली व अनेक विषयावर चर्चा झाली. मराठा सेवा संघ प्रणित पद्मश्री डॉ .विखे पाटील कृषी परिषद, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद ,अमृत पॅटर्न बद्दल सविस्तर चर्चा ,कपाशी व सोयाबीन विषयी अनुभव ,अमृत पॅटर्न चा प्रचार प्रसार कीर्तनाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून शेतकरी आत्महत्या रोखता आल्या पाहिजे व शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले पाहिजे अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यानंतर श्री गजानन महाराज संस्थान येथे सुद्धा भेट दिली. शिवश्री अमृतराव देशमुख यांनी सर्व मान्यवर मंडळींचा अमृत पॅटर्न ची पुस्तिका शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. ह भ प गंगाधर महाराज कुरुंदकर यांनी उपस्थित सर्व मंडळींना संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेची२०२३ची दिनदर्शिका भेट दिली. मराठा सेवा संघ महागाव तालुक्याच्या वतीने शिवश्री वसंतराव देशमुख सर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शिवश्री वसंतराव देशमुख सर जिल्हा समन्वयक मराठा सेवा संघ यवतमाळ,शिवश्री दत्तराव कदम संचालक महागाव जिनिंग प्रेसिंग, शिवश्री हानोतराव देशमुख अध्यक्ष गजानन महाराज संस्थान आंबोडा, शिवश्री एमडी मिरासे माजी तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ, डॉ. संदीप शिंदे मराठा सेवा संघ मार्गदर्शक, शिवश्री आशिष गावंडे तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड ,शिवश्री दादाराव ठाकरे ,शिवश्री सुनील पतंगराव ,शिवश्री दिनेश देशमुख, शिवश्री विश्वजित देशमुख, शिवश्री अतुल पतंगे व कुरुंदा आणि खंडोबा येथील शेतकरी बांधव उपस्थित होते.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी लतिफ शेख