सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात महागाव तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
महागाव विशेष प्रतिनिधी /
महागाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या २८ एप्रिलला होऊ घातली आहे. त्या निवडणुकीच्या अनुशंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कंबर कसली असून यासाठी सोमवारी दी.२७ महागाव येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात दुपारी एक वाजता तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी तसेच इंच्छुक उमेदवारांनी बैठक विचार विनिमय करण्यासाठी व नियोजन करण्यासाठी आयोजित केली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन महागाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख सवनेकर यांनी केली आहे