महागांव/ रात्री रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागची कारवाई.
महागाव/रात्रीच्या वेळी तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई करून ट्रॅक्टर जप्त केले.
कारवाई काल शुक्रवारी रात्री ७:३० दरम्यान करण्यात आली. महागाव तालुक्यातील चिल्ली इ. येथून रात्रीच्या वेळी अवैध रेती तस्करी होत असल्याची महसूल विभागाला मिळाली. त्यावरून उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड तहसीलदार विश्वंभर राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राम पंडित मंडळ अधिकारी महागाव कोतवाल चव्हाण वाहूळे लोणकर पोटे व वाहक आडे यांनी काल रात्री ७:३० वाजता चिल्ली ई येथे धाड टाकली त्यांच्या तिथे तस्करी होत असल्याने निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी ट्रॅक्टर वर कारवाई केली ट्रॅक्टर महागाव पोलीस स्टेशन लावण्यात आली