महागांव तालुक्यातील गारपीट ग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत द्या. संध्याताई संदेश रणविर.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी/ लतीफ शेख.
महागांव व तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीटीने गहू हरबरा पीक हातचे गेलेल्या शेतक-याच्या शेताचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत द्या अशी मागणी कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हाधीकारी, यवतमाळ यांना निवेदनाव्दारे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सौ. संध्याताई संदेश रणवीर यांनी केली आहे
गहू व हरभरा पीक काढण्याची तयारी सुरू होती कापुस पीक ही असतांना महागांव तालुक्यात झालेली गारपीट यामुळे शेतक-याचे प्रचंड नुकसान झाले आहे हे भरून न निघनारे असून पीडीत शेतक-याच्या शेताचा पंचनामा करून तात्काळ शेतक-यांना मदत द्या या आशयाचे निवेदन तहसीलदार महागांव च्या वतीने कृषीमंत्री यांना सौ संध्या रणवीर यांनी पाठवले आहे
निवेदन तहसीलदार श्री.राणे यांनी स्विकारले या वेळी संदिप ठाकरे हे ही उपस्थीत होते