महागाँव / झेप व बाला उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय पडताळणी समितीमार्फत जि. प. खडका शाळेची पाहणी,
मागाव तालुका विशेष प्रतिनिधी,लतिफ़ शेख
महागाव पंचायत समितीतील आदर्श व उपक्रमशील शाळा म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा खडका. शैक्षणिक सत्र २०२२-२३ यावर्षी शैक्षणिक विभाग जिल्हा परिषद तर्फे झेप व बाला हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची तपासणी जिल्हास्तरीय पडताळणी समिती मार्फत खडका येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा यांनी राबविलेल्या शाळेमधील झेप बाला उपक्रमा अंतर्गत विविध उपक्रमांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधला, शालेय परिसर, शालेय रंगरंगोटी , विद्यार्थी गुणवत्ता ,शैक्षणिक साहित्य आदी बाबी पाहून समाधान व्यक्त केले. या जिल्हास्तरीय पडताळणी समितीमध्ये श्री सुभाष धवसे (विस्तार अधिकारी यवतमाळ) श्री बजरंग बोडके( अधिव्याख्याता डायट) श्री रामकृष्ण बगाडे (विस्तार अधिकारी शिक्षण पुसद),श्री यशवंत देशमुख (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक), श्री रामभाऊ रोगे( विषय साधन व्यक्ती पुसद),श्री लुकेश लोखंडे( विषय साधन व्यक्ती महागाव)हे अधिकारी होते.तसेच खडका येथील श्री दत्तराव कदम माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,श्री संतोष देशमुख शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,डॉ.संदीप शिंदे शाळा व्यवस्थापन समिती बालविकास तज्ञ, श्री प्रदीप गावंडे मुख्याध्यापक ,श्री अनुप पंडित केंद्रप्रमुख हिवरा ,शिक्षक श्री कुणाल भगत ,निलेश रावेकर,कु.शितल वाघमारे व माधवराव मारटकर आदी उपस्थित होते.