घाटंजी मध्ये ५० सफाई कामगारांचा नागरी सत्कार
घाटंजी प्रतिनिधी / अरविंद जाधव
महिला दिनाचे औचित्य साधून कारभारणी महिला मंच चे आयोजन
—————————————-
घाटंजी – महिला दिनाचे औचित्य साधून घाटंजी शहराला स्वच्छ करणारे महिला सफाई कामगार आणि घंटागाडी कामगारांचा नागरी सत्कार घाटंजी येथील कारभारणी महिला मंच द्वारे करण्यात आला. यावेळी सर्व सत्कारमूर्तींना स्मृतीचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मधुसूदन चोपडे सर , प्रमुख पाहुणे डॉ. अशोकराव अत्रे, सौ. मृदुला अत्रे, मुकेशभाई गंडेचा, सौ. दीपिका गंडेचा, अनंतराव कटकोजवार आणि सामाजिक कार्यकर्ते महेश पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा राजूरकर यांनी केले.
ही सर्व स्वच्छ्ता कामगार संपूर्ण शहराची स्वच्छता करून गावाला सुंदर रूप देतात आणि जनतेच आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. हे मोठं काम आहे. त्यांच्या कार्याच्या गौरवासाठी आज हा नागरि सत्कार होत आहे. महेश पवारांची ही संकल्पना वाखण्याजोगी आहे. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुसूदनजी चोपडे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
यावेळी विविध संघटना आणि मान्यवर व्यक्तीच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. त्यामधे शिंपी समाज संघटना, गुरुदेव सेवा मंडळ, गणपती भजनी मंडळ, नटराज डान्स ग्रुप, अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रुप, स्त्रीशक्ती वीरांगणा ब्रिगेड, गायत्री माता मंदिर महिला मंडळ, भोजाजी महाराज मंडळ आणि भाजप महिला आघाडी यांच्या हस्ते सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला.
सफाई कामगार हातात झाडू घेऊन संपूर्ण कचरा गोळा करतात. मात्र या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम घंटागाडी कामगार करीत असतात त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपस्थिती मान्यवर गोलू फूसे, रीना धनरे, मनीष बोरकर, मनोज ढगले, भावेश सूचक, धनंजय भोरे, युनूस मेमन, अंकुश ठाकरे, महेश ठाकरे, अमित प्रधान, प्रदीप बावणे, दत्तात्रेय पोटपिल्लेवार, सचिन कर्णेवार, रमेश ताटेवार सर, ओम बिसमोरे, वासुदेव सिडाम, इत्यादी मान्यवर उपस्थित होते व यांच्या हस्ते सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अरुण मानकर सर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोशनी गोडे, वनिता माईंदे, योगिता पवार, वर्षा कोमावार, विजय कासार, विवेक घोडे, रवी चीव्हाणे, निशा राठोड, विष्णू शिंदे, स्वराज भगत यांनी अथक परिश्रम घेतले.