ताज्या घडामोडी

ऊस उत्पादक संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ पोफाळी येथे संपन्न

ऊस उत्पादक संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ पोफाळी येथे संपन्न

 

पाच तालुक्याची कामधेनु असलेला वसंत सहकारी साखर कारखाना, पोफाळी मागील पाच वर्षापासुन बंद अवस्थेत राहून कालांतराने अवसायानात गेला होता.

ऊस उत्पादक संघ, कारखाना बचाव संघर्ष समिती आणि रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने उभारलेल्या साडे तीन वर्षाच्या संघर्ष लढ्याला अखेर यश येऊन कारखाना भाडेतत्त्वावर गेला. यावर्षी यशस्वीरित्या गाळप झाले.

कारखाना सुरू होण्याच्या प्रक्रियेत ज्या – ज्या मान्यवरांचा प्रत्यक्ष सहभाग व मोलाचे योगदान लाभले अशा सत्कार मुर्तींचा वसंत ऊस उत्पादक सभासद संघाच्या वतीने पोफाळी येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील, उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेव ससाने, यवतमाळ जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टीकारामजी कोंगरे, रिपब्लिकन युवा सेनेचे यवतमाळ जिल्हाअध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, भैरवनाथ वसंत युनिटचे चेअरमन अजय देशमुख, अवसायक योगेश गोतरकर, तातुजी देशमुख, विजयरावजी खडसे, नितीनजी भुतडा, आत्माराम वाटेगावकर, अनुकूल चव्हाण, अविनाश खंदारे, दत्त वानखेडे, संतोष कलाने, जे. आर. गवळे, संजय गिरकर, साहेबराव कदम, गौतम नवसागरे, नंदु इटकरे, शुद्धोधन दिवेकर, अमोल जाधव, भीमराव खंदारे, साई पाटील, तातेराव पाटील, डॉ. गणेश घोडेकर, बळवंतराव चव्हाण, विश्वनाथ कानडे, संतोष साखरे, अविनाश आसोले, श्रीकांत पंडित, नागोराव सुर्यवंशी, दीपक राणे, पवन धुमाळे तसेच ऊस उत्पादक, शेतकरी व अवलंबित वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमरखेड तालुका प्रतिनिधी विजय कदम

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *