Umarkhed /गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांचा संप.
उमरखेड तालुक्यातील गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात आज दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या कडून एकदिव साचा लाक्षणीक संप पुकारण्यात आला होता या संपाला सर्व शिक्षक उपस्थित होते यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन अशा अनेक घोषणा देण्यात आल्या
१)सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जीवित करून सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करणे,
२) सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०’२०’३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापिठीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे,
३) सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या 1410 विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून विद्यापीठय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करणे
,४) विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे
५) 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे,
६) विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करणे,
अशा प्रकारच्या मागण्या मागण्यात आल्या.
उमरखेड तालुका प्रतिनिधी विजय कदम