महागांव /अवैध धंद्याची तक्रार करणाऱ्यास एपीआयची बेदम मारहाण ; एसपींकडे तक्रार ; बडतर्फ करण्याची मागणी अन्यथा आत्मदहनाचा इशारा
प्रतिनिधी / एस.के. चांद यवतमाळ
अवैध धंद्याची तक्रार केली म्हणून तक्रार कर्त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे,या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकाला बडतर्फ करून फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावी अश्या आशयाची तक्रार पीडित तरुणाने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे . समाधान श्रीराम राऊत रा.कलगाव असे मारहाण झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव आहे . तर देविदास पाटील असे मारहाण करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाचे नाव आहे . सामाजिक कार्यकर्ते समाधान राऊत याने मागील महिन्यात स्वगावातील आणि महागाव शहरात जुगार , मटका , असे अनेक अवैध व्यवसाय असल्याची तक्रार केली होती . त्या तक्रार बाबत चौकशी करण्यासाठी १३ फेब्रुवारीला सामाजिक कार्यकर्ते हे महागाव पोलीस स्टेशनला गेले होते.त्याच वेळी तिथे उपस्थित असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील यांनी अश्लील शिवीगाळ करून लाथाबुक्यानी मारहाण केली व खोट्या गुन्ह्यात अडकवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत नमूद केला आहे .
तसेच सदर प्रकार ठाण्यातील सिसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचा दावा तक्रार कर्त्याने केला आहे . त्यामुळे या संपूर्ण मारहाणीची चौकशी करून सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सेवेतून बडतर्फ करावे व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे . सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कार्यवाही न झाल्यास १ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा इशाराही यावेळी तक्रार कर्त्याने दिला आहे .जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेतली ; कार्यवाहीचे आश्वासन दिले : माझ्यावर घडलेल्या प्रसंगाची तक्रार मी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे . घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले . मानव अधिकार आयोगाकडेही तक्रार करणार आहे . समाधान श्रीराम राउत तक्रार कर्ता सदर प्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी दुरध्वनी व्दारे संपर्क साधला असता , ते म्हणाले की मि पोलीस स्टेशनला नाही आहे . व या प्रकरणी बोलण्याचे त्यांनी टाळले .