उमरखेड / रमाबाई भिमराव आंबेडकर जयंती निमित्त गांजेगाव येथे एक दिवसीय तिसरी बौद्ध धम्म परिषद संपन्न
विशेष प्रतिनिधी /
उमरखेड तालुक्यातील गांजेगाव येथे माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून काल दिनांक 07/02/ 2023 वार मंगळवार रोजी एक दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले होते सकाळी 10 वाजता पंचशील ध्वजारोहण सम्राट अशोका बौद्ध विहार गांजेगाव यांच्या हस्ते झाले दुपारी 12ते 2 भिकू संघाचे धम्म प्रवचन सायंकाळी 6 ते 8प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व अन्नदाते कैलासराव जयराम राऊत सूत्रसंचालन विजय झुकझुके सहसचिव नागेश राऊत चिवरदान शांताबाई धुळध्वज प्रमुख उपस्थिती शिक्षण महर्षी प्राचार्य मा.मोहनराव मोरे सर (दराटीकर) 2) मा.विजयराव खडसे( माजी आमदार उमरखेड विधानसभा ) 3) माननीय प्रताप भोस साहेब (पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बिटरगाव) 4) माननीय भैय्यासाहेब पाईकराव (समता सैनिक दल प्रमुख यवतमाळ) 5) मा.संबोधी गायकवाड (सभापती धानकी ) मा.बाळासाहेब चंद्र पाटील (कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उमरखेड) 6) माननीय प्रशांत विनकरे ( जिल्हा सचिव वंचित बहुजन आघाडी यवतमाळ ) तसेच करण भरणे सर,मा.आर डी माने सर अनिल कावळे व समस्त बौद्ध उपासक उपासिका व समस्त गावकरी मंडळ गांजेगाव यांची उपस्थिती तिसरी बौद्ध धर्म परिषद व रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली रात्री 8ते 9लहान मुलांचे बुद्ध भीम गीतावर प्रात्यक्षिके सादर रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत हिमेश भारती व त्यांचा संच व आम्रपाली खरात व त्यांचा संच यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.