महागांव / समता सैनिक दलाचे दोन दिवस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
महागाव :- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्हा अध्यक्ष माननीय रवी भगत सर यांच्या नेतृत्वात संरक्षण विभागाच्या वतीने सुभेदार रामजी बाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 1 फेब्रुवारी व 2 फेब्रुवारी पर्यंत बोधिसत्व बुद्ध विहार यवतमाळ येथे दोन दिवसीय शंभर सैनिकांचे समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
असून या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून के एम हेलोंडे लेफ्टनंट जनरल समता सैनिक दल बुलढाणा व आर ओ सावंत लेफ्टनंट कर्नल समता सैनिक दल बुलढाणा यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे एक फेब्रुवारी रोजी वेळ सकाळी दहा ते अकरा पर्यंत सैनिकांची नोंदणी मोहन भवरे तालुका शाखा यवतमाळ हे करतील प्रशिक्षणार्थीने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार सहकार्य करावे समता सैनिक दलाच्या शिबिराचे तंतोतंत पालन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिस्तीचे पालन करावे.
महागाव ग्रामीण प्रतिनिधी/ गौतम पडघने.