भूमाफियांचा हदगांव ची विधवा फरजाना बेगम महिलेची जमीन हडपण्याचा प्रयत्न.
नांदेड /हदगांव :
हदगाव येथील फरजाना बेगम महमूदखान पटेल राहणार जुना बस स्टँड हदगाव येथील रहिवासी असून गट सर्वे नं.१८७/१ यांची जमीन त्यांच्या सासऱ्याच्या नावे होती. त्या जमिनीचे तीन जणांमध्ये विभाजन करण्यात आले.१)तहसीन फातेमा अब्दुलखान पटेल, २) वहिदबी अजिजउल्लाखान पटेल, ३) फरजाना बेगम महमूदखान पटेल अशा तिघांना विभागून जमिनीची वाटणी करण्यात आली. परंतु मला या जमिनीबद्दल योग्य माहिती व जमिनीचा अनुभव नसल्यामुळे आमच्या मोठ्या दिल्याने ज्याप्रमाणे आम्हाला जमीन विभाजन करून दिली त्याचप्रमाणे ही जमीन आमच्या ताब्यात घेतली आहे पण आज रोजी या तीन विभाजनातून नामे वहीदिबी आजीजउल्लाखान पटेल यांनी प्लॉटिंग साठी दोन एकर जमीन नामे शेख आयुब आणि मोहम्मद अरिफ खान यांना विक्री केली आहे. या जमिनीमध्ये आदर्श नगर या नावाने प्लॉटिंग पाडलेली आहे आणि आज विक्री होत आहे. या जमिनीचा एन.ए. सुद्धा करण्यात आला नाही. त्यामुळे या जमिनीची योग्य मोजणी झालेली नाही तरी शेत सर्वे नंबर. १८७/१ मध्ये पाडलेल्या प्लॉटिंगची खरेदी विक्री शासकीय मोजणी झाल्याशिवाय कोणीही करू नये जमिनीची योग्यरित्या मोजणी करणे यापूर्वी आमच्या समक्ष सर्वे नंबर १८७/१ ची शासकीय मोजणी करून विक्री केल्यास आम्हाला व आमच्या वारसांना कोणती हरकत राहणार नाही ही मोजणी सासऱ्याच्या जुन्या ७/१२ नुसार फेरपराची चौकशी करून तसेच शासकीय मोजणी करून बराबरीने हिसे वाटणी करावी तोपर्यंत हदगाव नगरपरिषद किंवा रेस्टरी ऑफिसमध्ये किंवा तहसीलमध्ये सुद्धा फेरफार करू नये असे आशयाचे निवेदन फरजाना बेगम महमूद खान पटेल यांनी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच हदगावचे उपविभागीय अधिकारी,तहसील कार्यालय,दुय्यम निबंधक कार्यालय हदगाव, नगरपालिका मुख्य अधिकारी हदगाव यांना दिले आहे.
तसेच आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ह्या महिला म्हणाल्या की मी एक विधवा महिला असून मला दोन मुली दोन मुले असा परिवार आहे आम्हाला उदरनिर्वाहासाठी कोणताही दुसरा पर्याय नाही जर करून माझ्या या तक्रारीकडे लक्ष केंद्रित न केल्यास मी माझ्या सहपरिवारासहित हदगाव तहसील कार्यालय येथे आत्मदहन करणार आहोत व याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील असे बोलताना म्हणाल्या.