ताज्या घडामोडी

एसडीओ कार्यालयावर उमरखेड केंद्रीय रेल्वेमंत्री यांना शेतकऱ्यांचे निवेदन.

एसडीओ कार्यालयावर उमरखेड केंद्रीय रेल्वेमंत्री यांना शेतकऱ्यांचे निवेदन.

 

वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भूसंपादित केलेल्या शेत जमिनीचा वाढीव मोबदला द्या

शेतकरी धडकले एसडीओ कार्यालयावर उमरखेड तालुक्यातून जाणाऱ्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गासाठी भूसंपादित केलेल्या शेतजमिनीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठी व रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या अपत्यांना शासकीय नोकरीत प्रथम प्राधान्य देण्यात यावे तसेच रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या भूसंपादित झालेल्या जमिनी व्यतिरिक्त जमिनींचे अधिग्रहण करून मोबदला देण्यात यावा या मागण्यासाठी शेतकरी धडकले उपविभागीय अधिकारी कार्यालयावर

 

उमरखेड तालुक्यातील वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पात 16 गावांचा समावेश असून जवळपास 600 ते 700 शेतकऱ्यांचे जीविकांचे मुख्य साधन शेती आहे सदर प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतीपासून वंचित झालेले आहे या प्रकल्पात मार्लेगाव, संगम चिंचोली, बिटरगाव, उमरखेड, मरसुळ, दहागाव, बेलखेड, कुपटी, पळशी, नागापूर, तरोडा, मुळावा इत्यादी गावातून शेकडो हेक्टर शेती उपयोगी जमीन रेल्वे प्रकल्प निर्माण कार्यासाठी शासनाने भूमी अधिग्रहण केलेले आहे त्यातच सर्व शेतजमीन क्षेत्राखाली येतात त्यात नदीवर बोरवेल विहीर तसेच ईसापुर डाव्या कालव्याचे पाणी सिंचनासाठी सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध आहे त्यामुळे रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे हंगामी व बारमाही पीक ऊस, हळद, केळी, सोयाबीन, चना, तुर इत्यादी पिके शेतकरी घेत असतात त्यात काही रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिहीन व काही अल्पभूधारक शेतकरी झालेले आहेत त्यामुळे तालुक्यातील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे जीवन निर्वाहाचे मुख्य साधन शेतीपासून वंचित होत आहे .

2018 ला भूमी अधिग्रहण करून शेतीचा मोबदला सोबत देण्यात आला पण केंद्र शासनाने रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे शेत जमिनीचा भाव कवडीमोल दरात घेतला असून नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाला भरघोस मोबदल्या देण्यात आला त्याच मोबदल्याप्रमाणे रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी तालुक्यातील सर्व शेकडो शेतकरी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे दिनांक 18 जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले .

.वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्प साठी शासनाने भूमी अधिग्रहण केलेले जमीन तसेच त्यांचा मोबदला देण्यात आला पण शेतकऱ्यांचे अधिग्रहण केलेल्या शेतात असलेले वीहीर, बोरवेल, फळझाडे व इतर बांधकामे आणी पाईपलाईन व इतर बरेच काही बाबी शासनाकडून उर्वरित राहून गेलेले आहेत त्यांचा प्रशासनाने फेर विचार करून त्यांचे योग्य मूल्यांकन करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी करिता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष डेविड शहाणे, शहराध्यक्ष संजय बिजोरे पाटील, संदीप कोकाटे, प्रवीण कनवाळे, शिवाजी बिजोरे, केशवराव सूर्यवंशी, अरविंद सूर्यवंशी, गयाबाई वाठोरे, सुरज कऱ्हा

 

शहर प्रतिनिधी/अन्नपूर्णा बनसोड उमरखेड

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *