आरोग्य

घाटंजी केशव नागरी सहकारी पतसंस्था च्या कर्जदारास धनादेश अनादरप्रकरणी दंड व शिक्षा.

घाटंजी केशव नागरी सहकारी पतसंस्था च्या कर्जदारास धनादेश अनादरप्रकरणी दंड व शिक्षा.

घाटंजी तालुका प्रतिनिधी अरविंद जाधव – घाटंजी येथिल प्रतिष्ठीत केशव नागरी पतसंस्था मर्या. वणी शाखा घाटंजी या संस्थेतुन कर्जदार शंकर भावराव पांगुळ यांणी दि. ९.१.२०१७ ला नियमीत तारण कर्ज स्वरूपात १,५०००० रु कर्ज म्हणुन घेतले होते. सदर नियमित कर्ज तारणाची रक्कम परतफेड करते वेळी कर्जदाराणे संस्थेला दि. १५.२.१८ ला १८०५१७ रु रक्कमेचा यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती को बँक लि चा धनादेश संस्थेला कर्ज परतफेड म्हणुन दिला सदर धनादेश संस्थेणी वटवण्यासाठी बँक जमा केला असता तो अनादरीत झाला. यामुळे संस्थेणी कर्जदार विरोधात बँक फसवणुक म्हणुन न्यायालयात धाव घेतली.घाटंजी येथिल न्यायालयात खटला न्यायप्रविष्ट केले.कर्जदारास धनादेश अनादरीत प्रकरणी विद्यमान घाटंजी न्यायालयाणी कलम १३८ अंर्तगत कार्यवाही केली. या खटल्यात प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी श्री ए.ए. कळमकर न्यायालय क्र.२ यांणी संस्थेला न्याय देत आरोपी कर्जदारास धनादेश रक्कम १८०५१७/ रु ५०,००० रु दंड आणी ३ महीने कारावास रक्कम न भरल्यास १ महीन्याचा पुन्हा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात न्यायालयात संस्थेच्या वतिने अँड श्री चंद्रकांत एन. मरगडे तर, संस्थेतर्फे वसुली कर अधिकारी बजरंग पा. नामदेववार यांनी काम पाहीले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *