उमरखेड / वसंत नगर येथील बौद्ध विहारात नामविस्तार दिन साजरा
पोफाळीं प्रतिनिधी /सुहास खंदारे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा आज दिनांक 14 जानेवारी 2023 पोफाळी वसंतनगर सर्कल परिसरामधी ठिकठिकाणी नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. वसंत नगर येथील बौद्ध विहारांमध्ये मोठ्या प्रमाणात परिसरातील महिला पुरुष व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते . सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून पंचशील घेऊन मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार यासाठी केलेला संघर्ष याची जाणीव सर्वांना करून दिली व भोजन दानाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. त्यावेळेस वसंत नगरचे पोलीस पाटील. श्री बाळासाहेब खंदारे. मिलिंद खंदारे. ग्रा.प. सदस्य निकेश घाडगे एडवोकेट निरंजन पाईकराव भीमराव खंदारे कुंडलिक खडसे. प्रकाश घोंगडे सिद्धार्थ खडसे पत्रकार सौ सविता ताई घुगरे रवी काळे विजय वंजारे दीपक नागमोते परिसरातील सर्व मंडळी यांनी कार्यक्रम जल्लोशात पार पाडला.