उमरखेड/पतीने पत्नीचा गळा आवळून व दगडाने ठेचून केली हत्या.
आणि सोयाबीनच्या कुटारा खाली जाळून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न
उमरखेड.पो.स्टे.पोफाळी दिनांक 5-01-2023 रोजी पोफळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके यांना माळासोली गावातील सरपंच यांनी फोन करून सांगितले की. माळाआसोली शेत शिवारातील बापूराव चव्हाण यांच्या शेतातील सोयाबीनच्या कुठारामध्ये एक अर्धवट जळालेले मानवी प्रेत मिळून आले आहे. अशा खबरे वरून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी साहेब. ठाणेदार राजीव हाके साहेब. पोलीस निरीक्षक प्रताप भोष् ठाणेदार बिटरगाव .सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगळे. स्थागुशा .पो.उप. नि. राजेश पंडित .पो.उप. नि. गणेश राठोड किसन राठोड प्रकाश बोंबले राम गडदे रुपेश चव्हाण, संदीप ठाकूर, नितीन खवडे मुना आडे ,परशुराम इंगोले, यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेताची पाहणी केली असता सदर जळालेल्या प्रेताच्या हातात बांगड्या दिसून आल्याने प्रेत महिलेचे असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सर्व पोलीस कारवाई केल्यानंतर घटनास्थळाच्या शेजारी असलेल्या शेत संजय साखरे यांच्या पत्नी सौ.मायाबाई साखरे हे सकाळपासून गायब असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी संजय साखरे यांना संशयावरून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले व कलम 502,201, भा. द. वि. प्रमाणे गुन्हा नोंद केला संजय साखरे यांच्यावर संशय निर्माण झाल्याने त्याची सखोल विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली तरीसुद्धा पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याला विश्वासात घेऊन पुन्हा विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली व सांगितले की त्याची पत्नी सौ. मायाबाई संजय साखरे हि मागील बरेच दिवसापासून आरोपीस शरीर संबंध ठेवू देत नव्हती घटनेच्या दिवशी सुद्धा मृतक शेतामध्ये काम करीत असताना तिला आरोपीने शरीर सुखाची मागणी केली पण तिने नकार दिल्यामुळे व ती नेहमी संबंध ठेवण्यास नकार देत असल्यामुळे आरोपीला तिचा खूप राग आला व त्याने एका लाईलोन च्या दोरीने पत्नीचा गळा आवळून जीवाने ठार मारण्याचा प्रयत्न केला व नंतर जवळच्याच एका दगडाने तिच्या छातीवर वार केले त्यामध्ये तिचा मृत्यू झाला तेव्हा आरोपी घाबरून गेल्याने त्याने तिला शेजारच्या शेतातील सोयाबीनच्या कुटाराकडे घेऊन गेला व तिला कुटारा खाली टाकून तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला अशी कबुली दिली सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ .अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ .माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी साहेब. उमरखेड पोलीस निरीक्षक परदेशी साहेब. स्थागोशा. यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव हाके साहेब .पोलीस उपनिरीक्षक राजेश पंडित साहेब.किशन राठोड राम गडदे व प्रकाश बोंबले हे करीत आहेत..
पोफाळी वसंत नगर प्रतिनिधी/सुहास खंदारे