ताज्या घडामोडी

उमरखेड: सत्यशोधक स्व.भाऊसाहेब माने स्नेहसंमेलनला सुरुवात.

उमरखेड: सत्यशोधक स्व.भाऊसाहेब माने स्नेहसंमेलनला सुरुवात.

 

उमरखेड / सुभाष वाघाडे यांची रिपोर्ट

 

उमरखेड:-सत्यशोधक स्व.भाऊसाहेब माने स्मृतीदिना निमित्त श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चातारी ता. उमरखेड.येथे सत्यशोधक स्व.भाऊसाहेब माने स्नेहसंमेलन 2023 या कार्यक्रमाचे उदघाटन मा. देऊळगावकर साहेब तहसीलदार उमरखेड यांच्या हस्ते करण्यात आले.मा.तहसीलदार यांनी त्यांच्या शालेय जीवनातील खेळाबद्दलचा त्यांचा सहभाग व छंद याबद्दल विद्यार्थ्यांना परिचय करुन दिला. उमरखेड तालुक्यातील शैक्षणिक व समृद्ध शेती बद्दल माहिती दिली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रणनीतीची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी असलेले सुप्त गुण ओळखून त्या गुणानुसार करियर घडवावे, वाचन कौशल्य जोपासावे, महिला सबलीकरण या विषयी सखोल मार्गदर्शन केले.विद्यार्थी जीवनामध्ये इंटरनेटला जास्त महत्त्व आल्यामुळे इंटरनेटचा शालेय शिक्षणाबाबत चांगला उपयोग घ्यावा असे त्यांनी सांगितले.श्री संतोष माने सर यांनी प्रास्ताविकातून जन सामान्याविषयी असलेली तळमळ आणि त्यांच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट करण्याची तयारी स्व.भाऊसाहेब माने यांची होती असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गौरव रावते सर यांनी केले.तर आभार श्री.दिनकर थोरकर सर यांनी मानले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन कल्याणराव माने व प्रमुख पाहुणे म्हणुन शिवाजीराव माने हे होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *