ताज्या घडामोडी

अर्धापूर नगरपंचायत वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष योजने अंतर्गत रूपये ३ कोटी शासकीय निधी दिलेले असुन हे निधी तात्काळ रद्द युवा अध्यक्ष खतीब अब्दुल सोहेल

अर्धापूर नगरपंचायत वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष योजने अंतर्गत रूपये ३ कोटी शासकीय निधी दिलेले असुन हे निधी तात्काळ रद्द युवा अध्यक्ष खतीब अब्दुल सोहेल

 

नांदेड अर्धापूर / एस.के. चांद

 

अर्धापूर नगरपंचायतीच्या खात्यावर वैशिष्ट पूर्ण अनुदाना अंतर्गत वार्ड क्र.४ मध्ये ३ कोटी रूपये मंजूर झाले असून सदरील निधी हा सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड यांना देण्यात आले असल्याचे कागदपत्रे कळाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रोड, नाली हे बांधण्या करीता सदरील टेंडर दृष्टी इंटरप्रायजेस शास्त्री नगर, नांदेड यांना दिल्याचे दिनांक : १७.०२.२०२२ च्या वर्क ऑर्डर नुसार कळत आहे. ज्यामध्ये कामाचे स्वरूप अर्धापूर नगरपंचायत कृष्णनगर (हट्टेकर ते तामसा रोड) अंतर्गत सी. सी. रस्ता व नाली बांधकाम करणे, पुंडलिक नगर (तामसा रोड) ते मारोतराव कानोडे यांच्या घरापर्यंत सी. सी. रस्ता व नाली बांधकाम करणे, अंबाजीनगर ते पत्रे ते नगरसवेक लंगडे यांच्या घरापर्यंत सी. सी. रस्ता व नाली करणे, तामसा कॉर्नर (डॉ. राऊत ते तामसा कॉर्नर) सी. सी. रस्ता व नाली बांधकाम करणे, कै. सखारामजी लंगडे यांच्या घरापासुन ते त्यांचा मुलगा नामे मुंजाजी लंगडे व संजय वाघमारे यांच्या घरापर्यंत नाली व सी. सी. रस्ता बांधकाम करणे, बसवेश्वर नगर ते हट्टेकर यांच्या घरापासुन ते जडे यांच्या घरापर्यंत नाली व सी. सी. रस्ता बांधकाम करण्याकरीता वैशिष्ट पूर्ण अनुदान योजने अंतर्गत ३ कोटी निधी नगरविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांनी अव्वर सचिव विवेक कुंभार यांच्या स्वाक्षरीने एकुण रक्कम २,९९,७५,५२६.००/- एवढी रक्कम नगरपरिषदांना वैशिष्टपुर्ण कामासाठी विशेष-ठोक तरतुद लेखाशिर्ष (२०१८-१९) (७२१७०६०३) अर्धापूर नगरपंचायत, जि. नांदेड यास मंजूर केला आहे व सदरील कामाकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यान्वय यंत्रणा राहील असा आदेश पारीत केला आहे. यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरील कामाचे टेंडर हे दृष्टी इंटरप्रायजेस शास्त्री नगर, नांदेड यांना वर्क ऑर्डर दि. १७.०२.२०२२ रोजी दिले आहे. सदरील कामे हे आर.सी.सी. रस्ते, नाली बांधकामाचे आहे हे बांधतांना सार्वजनिक बांधकाम विभागाने कामे करतांना कामांची बाबी समाविष्ठ केल्या आहेत. त्यामध्ये रस्त्याचे व नालीचे खोदकाम करणे, नालीसाठी सोलींग करणे मुरूम Blanketing करणे, रस्त्यासाठी जीएसबी थर देणे, रस्त्यासाठी ड्रायलिन सिमेंट काँक्रीट करणे गजाळीसहीत, रस्त्यासाठी एम-३० मध्ये काँक्रीट करणे, रस्त्यासाठी पॉलिथिन टाय बार डावेलबार वापरणे, नामफलक बसविणे से कामे करण्याचे निर्देश दिले आहेत. हे कामे झाल्यावर शासनाचा निधी हा चुकीच्या पध्दतीने वापर होईल. सदरील निधीचा दुरूउपयोग होणार ही बाब आपण लक्षात घेता सदरील कामाचे वर्क ऑर्डर रद्द करून सदरील काम तात्काळ थांबवुन हा निधी नगरपंचायतीच्या विविध विकासामध्ये लावण्यात यावा. कारण की, अर्धापूर नगरपंचायत अंतर्गत शहराच्या मलनिस्सारण गटार योजना करीता पहिला टप्पा ४२ कोटीचा मंजूर झाला असून त्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता शासनाने नगरविकास विभागाने दिलेली आहे. या ४२ कोटीच्या निधीमध्ये वेगवेगळ्या शहरातील नगरपंचायत अंतर्गत वेगवेगळ्या प्रभागामध्ये टंकमेन, पंपिंग स्टेशन केंद्र व नालाबंध, सर्व गल्ली-बोळात मलनिस्सारणाची पाईप लाईन करून रोडच्या मध्य भागातुन चेंबर टाकण्यात यावे अशी शासनाची मंजुर मिळाली आहे यामध्ये ४२ कोटीची पहिला टप्पा म्हणून मंजुरी व निधी प्राप्त झाला आहे व हे काम करण्याकरीता शहराच्या वसाहती व कामाचा आढावा घेतल्यास सदरील काम पूर्ण करण्याकरीता ३ ते ४ वर्ष लागतील असे अंदाजपत्रकात दर्शविण्यात आले आहे.करीता शासनाच्या पैशांचा दुरूउपयोग टाळण्याकरीता शासनाने दिलेल्या नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्र. ३ मध्ये नगरसेवक लंगडे यांच्या आजूबाजूलाच वस्ती नसलेल्या जागेवर सदरील काम होत असल्याने निधीची चुकीच्या पध्दतीने विल्हेवाट लावण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग दृष्टी इंटरप्रायजेसचे मालक व वार्ड क्र.४ चे लोकप्रतिनिधी करतांना दिसत आहे. याकडे आपण तात्काळ लक्ष देवून आपण दिलेल्या ३ कोटी निधी हा परत शासनास जमा करण्यात यावा. कारण हे काम झाल्यास परत बांधलेले रस्ते तोडण्यात येतील त्या जागेवर मलनिस्सरण, ड्रेनिज लाईन टाकण्याकरीता बांधलेले आर. सी. सी. रस्ते परत फोडून काढण्यात येतील. शासनाचे करोडो रूपयांचे नुकसान होईल. अर्धापूर नगरपंचायत अंतर्गत गावठाण हद्दीतील दर्गाह आसावे रसुल यांची सुरक्षा भिंत बांधणे, नमाजाचा ओटा बांधणे, दर्गाह बालेपिर राजा मुस्लीम दफनभुमी यास सुरक्षा भिंत बांधणे व सुशोभीकरण करणे, ही निधी असे वापर करावे या असे भ्रष्टाचार विरोधी समितीचे मराठवाडा युवा अध्यक्ष खतीब अब्दुल सोहेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *