ढाणकी शहरात सिमेंट व डांबरी रस्त्यांचे आमदार नामदेवराव ससाने साहेब यांच्या हस्ते भुमीपूजन संपन्न.
उमरखेड / सुभाष वाघाडे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना व नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना सन २०२१-२२ अंतर्गत, सिमेंट रस्ता व डांबरीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, आज दिनांक १७ नोव्हेंबर रोजी उमरखेड-महागाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार, नामदेवराव ससाने यांचे हस्ते तथा भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनजी भुतडा यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले.
सदर रस्ते शहरातील प्रभाग क्रमांक ३,४,७,१०,१२,१६ व १७ मध्ये लवकरच कामास सुरुवात होईल, असे नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी माहिती दिली. सर्वप्रथम जुने बस स्टॉप येथे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून, भूमिपूजनाच्या कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी ढाणकीचे प्रथम नागरिक सुरेश जयस्वाल, तालुका संघचालक आनंदराव चंद्रे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे, भाजपा तालुकाध्यक्ष सुदर्शन रावते, भाजपा ढाणकी शहराध्यक्ष रोहित वर्मा, भाजपा शहर उपाध्यक्ष नागेश रातोळे, गोविंद मिटकरे, भाजपा गटनेते संतोष पुरी, नगरसेवक बाळू योगेवार, चंपत मिटकरे, संबोधी गायकवाड, बशनूर बी सय्यद खलील, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जाँन्टी विनकरे, साई मंतेवाड, पंकज केशेवाड,श्रीकांत देशमुख, गणेश सुदेवाड, करण भरणे, पुंजाराम हराळे, महेश शहाणे, तुकाराम ताटे, सुभाष गायकवाड, उत्तम रावते, सुनील मांजरे यांसह शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते.बस स्टॉप वरील मुख्य भूमिपूजन झाल्यानंतर, प्रत्येक प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या हस्ते सुध्दा प्रत्येक प्रभागात भूमिपूजन पार पडले.याप्रसंगी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.