उमरखेड येथे भाऊसाहेब माने उष्मायन संस्करण कक्षाचे करण्यात आले उद्घाटन
उमरखेड/प्रतिनिधी : सुभाष वाघाडे
अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ चे सहयोगी अधिष्ठाता डॉ विजयराव माने यांनी 16 नोव्हेंबर ला वाढदिवस अभष्टचिंतन प्रसंगी सत्काराला उत्तर देताना सांगितले कि तुम्ही “उब” द्याल तर तुम्हाला “तूप” मिळेल’.
या प्रसंगी डॉ. विजय माने यांनी भाऊसाहेब माने यांच्या नावाने उष्मायान संस्करण कक्षा ची स्थापना केली. हल्ली ज्या कोंबडी ने अंडे दिले तर त्याच कोंबडीने त्या अंड्याला ऊब देऊन पिल्लांना जन्म घालणे जरुरी नाही, एक कोंबडी अंडे देते तेच अंडे दुसऱ्या कोंबडी खाली किंवा इंनक्यूबेटर मशीन मध्ये उबऊन पिल्लांचे संस्करण होऊन पिल्लांना जन्म दिला जातो, हे जर पशु पक्ष्यांमध्ये शक्य आहे तर माणसांमध्ये का शक्य होऊ नये. अशी संकल्पना आणि संस्करण शिक्षणामध्ये ही करता येऊ शकते. भरमसाठ वाढलेली लोकसंख्या, आणि शासकीय शिक्षण संस्थाना मध्ये मर्यादित असलेली प्रवेश शमता व भरमसाट प्रवेश शुल्क यामुळे प्रत्येक विद्यार्थांना आवड असल्येल्या शिक्षण शेत्रात शिक्षण घेण्याची संधी मिळेलच याची श्यास्वती नाही. अशा परिस्थितीत आर्थिक दुर्बल असणाऱ्यांच्या हुशार आणि होतकरू मुलांना आवडते शिक्षण घेणे कठीण होत आहे. अशा टॅलेंट असलेले विद्यार्थांना इच्छा असलेल्या अभ्यासक्रमासाठी संधी मिळत नसल्यामुळे हे टॅलेंट प्रवाहा बाहेर जाऊन देशाची खुप मोठी हानी होणार आहे. अपुऱ्या सुविधा आणि मर्यादित प्रवेश शामाता असल्यामुळे “प्रवेश परीक्षा” नावाचे राक्षस या टॅलेंट ला खाऊन टाकत आहे. सध्या शासनाने आर्थिक कमकुवत असणाऱ्या घटकांना आरक्षण दिले आहे, परंतु या मर्यादित १०% आरक्षणामध्ये शर्ती आणि अटीमुळे फार कमी लोकांना फायदा होतांना दिसत आहे, या मध्ये गरजू विद्यार्त्यांची संख्या खुप जास्त आहे. या सोबतच ज्या विद्यार्थांना सामाजिक आरक्षणाचा लाभ मिळतो परंतु मेरिट क्रॅक करू न शकणाऱ्याना शिष्यवृत्ती चा लाभ मिळत नाही आणि ही संख्या ही भरपूर आहे. अशा टॅलेंट ला शिक्षणासाठी आर्थिक ऊब देऊन संस्करण करण्याची आवश्यकता आहे, ही ऊब देण्याच्या क्रियेला “उष्मायन” म्हणतात तसेच दुधाचे – दही-ते -ताक – ते- लोणी आणि या लोण्याला गवरीची ऊब देऊन तूप निर्माण होते हे एक “संस्करण” आहे.
यावेळी डॉ माने यांनी त्यांच्या वाढदिवसी भाऊसाहेब माने शैक्षणिक उष्मायान संस्करण कक्ष निर्माण करून नाशिक जिल्ह्यातील सर्गणा तालुक्यातील राहुडे गावचा आदिवासी समाजातील एक गरीब होतकरू विद्यार्थी विश्वास भाऊसाहेब पिठे याला आर्थिक आणि शैक्षणिक ऊब (उष्मायन) देऊन संस्करण करण्याचा संकल्प करून या उष्मायन संस्करण कक्षा चे उद्घाटन केले आहे. तसेच डॉ. माने यांच्या आर्धांगणी ॲड. अर्चना माने यांनी नाशिक जिल्ह्यातील त्याच विध्यार्थ्यांची बहीण कु. योगिता भाऊसाहेब पिठे हिला शैक्षणिक दृष्ट्या आर्थिक ऊब देऊन शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेऊन आपला वाढ दिवस साजरा केला आहे. या प्रसंगी या उपक्रमात गर्जुवंत विद्यार्थांची नोंदणी करून मदत देणाऱ्यांना या उपक्रमामध्ये हातभार लावण्यासाठी अनेक गरज आणि टॅलेंट असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऊब देऊन संस्करण करून समाधानाचे तूप घ्यावे यासाठी झोळी पसरून भिक मागतो आहे .” असे भावनिक आवाहन याप्रसंगी डॉ विजय माने यांनी केले. यावेळी विचारमांचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार विजयराव खडसे, चिंतागराव कदम, नितीन भूतडा, हिंगोली चे माजी आमदार वडपुले, डॉ वी ना कदम,रमेश चव्हाण, प्र. भा. काळे, नितीन माहेश्वरी, सविताताई कदम , प्रज्ञानंद खडसे, राजू गायकवाड विविध शेत्रातील सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश कदम यांनी, संचलन प्रवीण सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन सुधाकर वानखेडे यांनी करून अशा समाज उपयोगी उपक्रमा चा प्रारंभ, लोक नेते भाऊसाहेब माने यांच्या स्मुर्ती प्रीत्यर्थ व त्यांच्या प्रेरणेतून साकार होत आहे.