हिमायतनगर /करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिक्षकांची दांडी.
तालुका गट शिक्षण अधिकारी हिमायतनगर यांचे साफ दुर्लक्ष.
मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर (घुगे ) यांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज.
हिमायतनगर / एस.के. चांद यांची बातमी
हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक मनमानी कारभार करत कधी वेळेवर उपस्थित न राहता तर कधी करंजी येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावून शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याने खेळत असल्याचा प्रकार आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी करंजी येथील ग्रामस्थ व गावकऱ्यां पासून उघड झाला आहे
याबाबत सविस्तर वर्त असे की हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथे शासनाकडून लाखो रुपये खर्च करून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या लेकरांना शिक्षण घेण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधण्यात आली असून शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी हजारो रुपये पगार देऊन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेले आहे परंतु करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक कधी गैरहजरित राहत आहेत तर कधी शाळेला कुलूप लावून मनमानी कारभार करत सर्वसामान्य जनतेच्या लेकरांच्या शिक्षण व भविष्यासोबत खिलवाळ करून शासनाची दिशाभूल करून हजारो रुपयांची पगार आपल्या कामात व्यस्त राहून घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र याकडे वरिष्ठ अधिकारी व तालुका गटशिक्षण आधिकारी हिमायतनगर यांचे मात्र साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून आल्याने करंजी येथील ग्रामस्थ सोबत गावकऱ्यांनी करंजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर दिनांक 12 नोव्हेंबर रोजी जाऊन पाहणी केल्यास शाळेवर शिक्षक गैरहजर राहुन शाळेतील लेकरांना सुट्टी देऊन शाळेला कुलूप असल्याचे दिसून आल्याने करंजी येथील नागरिकांनी तालुका गटशिक्षणाधिकारी व बी डि ओ साहेब हिमायतनगर यांना संपर्क साधून करंजी येथे शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे करंजी येथील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या लेकरांना शिक्षणापासून वंचित ठेऊन त्यांच्या भविष्यासोबत शिक्षकाकडून खेळला जात असल्याचे आरोप केले आहे व करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर असलेल्या शिक्षकांची तात्काळ चौकशी करून कोणाच्या आदेशावरून शाळेला कुलूप लावण्यात आले होते याची चौकशी करून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तरी या सर्व बाबींकडे मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर (घुगे ) यांनी तात्काळ लक्ष देवून विद्यार्थीयांच्या भाविष्याने खेळणाऱ्या शिक्षकांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्याकडून करण्यात येत आहे