ताज्या घडामोडी

उमरखेड तालुक्यातील मौजे अनंतवाडी शाळा विद्यार्थ्यांच्या भरोशावर.

उमरखेड तालुक्यातील मौजे अनंतवाडी शाळा विद्यार्थ्यांच्या भरोशावर.

 

ब्युरो रिपोर्ट / सुभाष वाघाडे उमरखेड

 

उमरखेड तालुक्यातील अनंतवाडी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ही विद्यार्थ्यांच्या भरोशावर चालत आहे कारण तिथे शिक्षकच नाही आहेत एक ते चार पर्यंत शाळा आहे पण त्यांना शिकविण्यासाठी एकच शिक्षक आहेत आणि ते शिक्षक सुद्धा शाळा उघडून सर्व मुलांना एकाच वर्गात बसून उमरखेडला गेले असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे जर या राज्यामध्ये अशी शिक्षण व्यवस्था असेल तर विद्यार्थी कसे घडतील या गोष्टीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे अनंतवाडीच एक उदाहरण आहे तालुक्यातील बऱ्याचशा शाळा आशा आहेत तिथे शिक्षकाची कमी जाणवत आहे तरीही स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबतीत थोडासा विचार करणे गरजेचे आहे कारण ही गोष्ट येणाऱ्या भविष्याची आहे ही गोष्ट भाविक भगत हेल्प फाउंडेशन तालुकाध्यक्ष राजकुमार शिरगिरे तालुका विद्यार्थी संघटना निकेश राठोड तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी संघटना नरेंद्र अवधूत तालुका सचिव विद्यार्थी संघटना विजय अवधूत न्यूड शाखाप्रमुख प्रकाश पारडे ग्रामपंचायत सदस्य अंभोरे यांनी शाळेला भेट दिली असता हा प्रकार त्यांच्या डोळ्यासमोर आला आहे आणि या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करून ही समस्या लवकरच सोडवणार असल्याचे त्यांनी आमच्याशी फोनवरून बोलताना सांगितले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *