आरोग्य ताज्या घडामोडी

हिमायतनगर – किनवट राष्ट्रीय महामार्गावर अपघात वाढले कंत्राटदार – अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्याची वारंवार मागणी.

हिमायतनगर – किनवट राष्ट्रीय महामार्गावर अपघात वाढले कंत्राटदार – अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्याची वारंवार मागणी.

 

मुख्य संपादक एस.के. चांद यांची बातमी

 

हिमायतनगर शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अ रेल्वे गेट पासून ते मौजे इस्लापूर – जलधारा- धानोरा बोधडी – चिखली फाटा ते कोठारी चि . तालुका किनवट पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे दुहेरी सिमेंटीकरण करण्याचे कंत्राट में सुनील हायटेक कंपनी औरंगाबाद / परभणी यांना निविदा भरून काम मंजूर झाल्याचे गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी मिळाले असल्याचे कळते आहे . परंतु या महामार्गाचे काम त्यांनी एका पोट गुत्तेदार मे.राही कंट्रक्शन कंपनी नागपूर यांची प्रत्यक्ष नेमणूक करून त्यांना महामार्गाचे काम करण्यासाठी दिलेले आहे . हे मुख्य आणि पोट गुत्तेदार हे दोघेही राजकीय वलय प्राप्त पक्षांशी संबंधित असल्या कारणाने मुंबई , नवी मुंबई , कोकण , औरंगाबाद कार्यालया येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंत्यांनी राजकीय लोकांशी आणि गुत्तेदारांशी कामावरून वैर नको म्हणून की काय ? या कारणामुळे रस्त्याच्या कामाविषयी चालू असलेल्या संथगतीने होणाऱ्या महामार्ग कामाविषयी नेहमीच दुर्लक्ष पणा केल्याचा प्रत्यक्ष अनुभव शहर वासियांसह , लोकप्रतिनिधीला दिसून येत आहे . यामुळे हा रस्ता कित्येक वर्षांपासून अर्धवट आणि संथगतीने , जागोजागी खड्डे खोदन ठेवल्याने रस्ता प्रलंबितचं पडलेला आहे . याकडे ना लोकप्रतिनिधीचे ना अभियंत्याचे लक्ष नसावे काय ? असाही प्रश्न प्रवासीवगांना पडत आहे . हिमायतनगरसाठी दुर्दैवाचीच गोष्ट म्हणावी लागेल , मागील काही महिन्यांपासून या राष्ट्रीय महामार्गावर एका पाठोपाठ एक दिवस – रात्र नेहमीच अपघात होऊन आत्तापर्यंत दहा ते बारा नवयुवकांचा प्राण गेल्याचे पोलीस स्टेशनच्या क्राईम नोंद डायरी वरून दिसून येत आहे . महामार्गावर कोठेही दिशादर्शक , पथदर्शक फलक आणि गतिरोधक तसेच काम सुरू असल्याचे फलक नसल्याने रस्त्यावर रोजच दिवसारात्रीला प्रवास करणाऱ्यां वाहनधारकांचे अपघात या व होत असल्याचे दिसून येत आहे . . केवळ ग ” ” दारा निकृष्ट दर्जामुळे , नियोजनशून्य निष्काजीपणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात नवयुवकांचे जीव गेल्याचे यावेळी प्रवासी वर्गातून बोलल्या जात आहे . महामार्गाच्या बाजूला खोदलेली नाली , दुभाजकांची कमीअधिक उंची न समजल्याने अनेकांचे अपघातात जीव गेल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांकडून संबंधित गुत्तेदार व राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची वारंवार मागणी होत आहे . परंतु अद्यापही संबंधित गुत्तेदारांवरआणि अभियंत्यावर गुन्हा दाखल झालेला नाही . आतापर्यंत आणि पुढील काळात या अर्धवट व अपूर्ण कामामुळे किती जणांचा जाईल , हे येणाऱ्या काळातच सांगता येईल.गुत्तेदारांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्गचे काम शीघ्रगतीने करून रस्ता जनतेला खुला करून देण्याची मागणी होताना दिसून येत आहे .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *