ताज्या घडामोडी

तालुका प्रशासना विरुद्ध शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

तालुका प्रशासना विरुद्ध शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

——————————————————-

शेतकऱ्यांनी दिला १० नोव्हेंबरला उपोषणाला बसण्याचा इशारा;

——————————————————

शेखडो शेतकरी उपोषणाला बसणार

——————————————————-

तालुक्यातील पहिल्यांदा घेतली शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पत्रकार परिषद

——————————————————-

घाटंजी :- अतिवृष्टी अनुदानापासून वंचित असलेले शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दि.१/११/२२ रोजी निवेदन सादर करित शंभर टक्के मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली.व त्या निवेदनातून सात दिवसाच्या आत आमच्या मागणीची दखल घेऊन न्याय मिळावा अन्यथा आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा निवेदनातून दिला होता.

परंतु या निगरघट्ट तालुका प्रशासनाने शेतकऱ्यांच्या निवेदनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसून त्यामुळे सहकार क्षेत्रातील मा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिषेकभाऊ ठाकरे व यवतमाळ जिल्ह्य मध्यवर्ती बॅक पांढरकवडा विभागीय अध्यक्ष आशिष लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात शेखडो शेतकरी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व मिळणारे अनुदान यात तालुका प्रशासन यांची मुजोरी व हेतुपुरस्सर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या अहवाल कमी दाखवन्यात आला त्यामुळे दिनांक 10 नोव्हेंबर 2022 ला

तालुक्यातील सर्व शेतकरी तहसीलदार गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी यांच्या विरोधात आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे त्यात प्रमुख मागण्या

——————————————————-

1)जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट अतिवृष्टी अनुदान 13600 रु हेक्टर देण्यात यावी

2) माहे सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे 100%अनुदान देण्यात यावे

3) सदोष अहवाल दुरुस्ती करून विमा कंपनी व वरीष्ठ कार्यलयास कळवून शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात यावा

4)चुकीचा अहवाल सादर करणाऱ्या अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अश्या प्रमुख मागण्याचे निवेदन मा, जिल्हा अधिकारी यांना देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.

यावेळी संजय इंगळे, वामन राठोड, सागर मानकर ,संजय गोडे ,अरविंद महल्ले, आशीष भोयर, जितेंद्र कळसकर ,सुनील देठे ,अजय डेहनकर, गुणवंत लेनगुरे, उध्दव देवतळे, किशोर वानखडे,महेश ठाकरे , संतोष मोहूर्ले, दामोदर साखरकर ,राजू मानकर,अतुल भोयर व अनेक शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते….

0000000

 

 

****(बॉक्स)******

घाटंजी तालुक्यातील 31000 जवळपास शेतकरी असताना माहे जुलै मध्ये केवळ 28228 शेतकरी अतिवृष्टी मध्ये दाखवण्यात आले व ऑगस्ट महिन्यात केवळ 3339 शेतकरी अतिवृष्टी ग्रस्त दाखवण्यात आले यावरून जुलै महिन्यात 31000 शेतकऱ्यां पैकी 28228 शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टी झाली का? व माहे ऑगस्ट महिन्यात 3339 शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टी झाली का ? तालुक्यातील 31000 शेतकरी असताना प्रत्येक महिन्याच्या अहवाल शेतकऱ्यांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे त्यावर तालुका प्रशासनाचा अहवाल खोटा असल्याचा दिसून येत आहे याचे उदाहरण म्हणजे माहे 7 ऑगस्ट 2022 मध्ये तालुक्यातील मेजदा व वाढोना गावात ढग फुटी झाली यात सर्व शेतात पाणी पाणीतर गावात घरात पाणी शिरले त्यामुळे गावातील घराचे व शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक शेतातील पिके खरडून गेली असताना तालुका प्रशासनाच्या वतीने सर्व अधिकारी यांनी भेटी दिली व पाहणी केली परंतु ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झालेल्या अहवालात याच गावाची नोंद नसल्याचे आरोप अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांनी केला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *