आरोग्य ताज्या घडामोडी

शिरफुल्ली येते वाघाच्या हल्ल्यात गाय ठार. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरफुल्ली येते वाघाच्या हल्ल्यात गाय ठार. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 

मुख्यसंपादक/ एस.के. चांद यांची बातमी

 

 

महागाव तालुक्यातील शिरफुल्ली येथे वाघाच्या हल्ल्यात गाय जागीच ठार झाली असून गावामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे . शिरफुल्ली येथील शेतकरी संदीप उबाळे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या गावलगतच्या गोठ्या समोरील खुल्या जागेमध्ये बांधली होती . सायंकाळी मध्यरात्रीला वाघाने गोठ्या समोरील जनावरावर हल्ला केला यात वाघाने गाईला जागीच ठार केले . या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे . शेतकरी संदीप उबाळे यांनी या संदर्भात महागाव येथे नुकसान भरपाई मिळावी याकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी यांना अर्ज केला या अर्जाची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी धुळे घटस्थांनी जाऊन पंचनामा केला मृत प्राणीचा शवविच्छेदन केले .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *